आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भवादी नेते अनभिज्ञ, शिवसेनाही गाफिल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विदर्भराज्य अाघाडीतर्फे रविवारी झालेली विभागीय कार्यकर्ता बैठक पत्रकार परिषदेबाबत एकीकडे स्थानिक अनेक विदर्भवादी अनभिज्ञ हाेते, तर दुसरीकडे अखंड महाराष्ट्राचा पुरस्कार करणारी शिवसेना गाफिल हाेती, असे असले तरी कार्यक्रमस्थळी तगडा पाेलिस बंदाेबस्त तैनात करण्यात अाला हाेता.
विदर्भाच्या मागणीसाठी अकाेला जिल्ह्यात अनेक वर्षांपासून अभिनव पद्धतीने अांदाेलने सुरु अाहेत. गणेश पाेटे, संजय चाैधरी, धनंजय मिश्रा, अॅड. बी.के. गांधी यांच्यासह अनेक विदर्भवादी नेते अाहेत. त्यांनी अनेकदा महाराष्ट्रदिनी विदर्भासाठी स्वतंत्ररित्या ध्वजाराेहणही केले.
यासाठीतयार वेगळ्या विदर्भचा झेंडाही तयार केला हाेता. यापैकी बहुताश:नेते रविवारी झालेल्या विभागीय बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांना पत्रकार परिषद अाहे, याचीही माहिती नव्हती. विदर्भ राज्य अाघाडी एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची तयारी करत अाहे, तर दुसरीकडे निवडणुकांचा अनुभव असलेले स्थानिक विदर्भवादी नेते यापासून अनभिज्ञ हाेते.

तगडा पोलिस बंदाेबस्त
विदर्भ राज्य अाघाडीची विभागीय बैठक पत्रकार परिषदेमध्ये काेणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तगडा पाेलिस बंदोबस्त तैनात केला हाेता. शहर पाेलिस उपअधीक्षक उमेश माने, ठाणेदार सुभाष माकाेडे, सी. टी. इंगळे, शेख अन्वर यांच्यासह तीन उपनिरीक्षक यांच्यासह १५ पेक्षा जास्त पाेलिस कर्मचारी उपस्थित हाेते.

पाेलिसांचा असाही धसका
विदर्भ राज्य अाघाडीचे नेते अणे यांना यापूर्वी शिवसेनेने अकाेल्यात विराेध केला हाेता. त्यामुळे विभागीय बैठक झालेल्या शासकीय विश्रामगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दाेन पाेलिस तैनात केले हाेते. दुचाकीस्वाराला अातमध्ये प्रवेश देण्यात येत नव्हता. साध्या वेशातील पाेलिस प्रत्येकाची विचारपूस करुनच त्याला अातमध्ये प्रवेश देत हाेते. पत्रकारांनाही शाईचा पेन तर नाही ना, अशी विचारणा पाेलिसांकडून करण्यात अाली.

मुख्यमंत्र्यांना विचारा
वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरुन अणे यांना विराेध केल्याच्या घटना घडल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमस्थळी पोलिस बंदाेबस्त तैनात करण्यात येताे. विदर्भ अांदाेलनात शिवसेना-मनसेला गृहितच धरण्यात येत नसल्याने एवढा पाेलिस बंदाेबस्त का तैनात केला, असा प्रश्न विचारला असता याचे उत्तर मुख्यमंत्रीच देतील असे सूचक उत्तर अणे यांनी दिले.

शिवसेना नेते बाहेरगावी, मनसेने केली चाचपणी
एकिकडे अकाेल्यात विदर्भ राज्य अाघाडीची विभागीय बैठक सुरु हाेती, तर दुसरीकडे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी नेते बाहेरगावी हाेते. बैठकस्थळाची मनसेने पाहणी केली हाेती. मात्र, तगडा पाेलिस बंदाेबस्त लक्षात घेता, त्यांनी संभाव्य कृती केली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. विदर्भवादी नेत्यांच्या बैठकीला पाेलिस नेत्यांची संख्या जवळपास एकसारखीच हाेती.
पुढील अाठवड्यात बैठक
मनपासह जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी २३ अाॅक्टाेबरला बैठक हाेणार असल्याची माहिती विदर्भ राज्य अाघाडीचे नेते श्रीहरी अणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शनिवारी काही स्थानिक नेत्यांशी चर्चा झाली अाहे. स्थानिक विदर्भवादी नेते हे एखाद्या राजकीय पक्षांशी संबंधित असतील, असेही ते म्हणाले.

आंदोलन तीव्र करावे
^वेगळ्या विदर्भाच्यामुद्यावर निवडणुका लढवल्यास अांदाेलनाचे नुकसान हाेईल. त्यामुळे निवडणुकांएेवजी अांदाेलन तीव्र करावे. -गणेश पाेटे, विदर्भवादी नेते.

जनमताचा काैल घ्यावा
^वेगळ्यािवदर्भामुळे युवक राेजगार, उच्च शिक्षणापासून वंचित राहतील. त्यासाठी विदर्भवाद्यांनी जनमताचा काैल घ्यावा. -डाॅ. शंकरराव वाकाेडे, जिल्हाध्यक्ष मनसे.

१) निर्णयावर टिका
^वेगळ्या विदर्भासाठीनिवडणुकी लढवता जनमत घ्यावे. विदर्भ राज्य अाघाडीची बैठक पत्रकार परिषदेबाबत कळवले नाही. -संजय चाैधरी, विदर्भवादी नेते.

अखंडतेसाठी कटिबद्ध
^अणे यांना यापूर्वीही शिवसेनास्टाईल विराेध करण्यात अाला. अखंड महाराष्ट्रासाठी िशवसेना कटिबद्ध अाहे. -राजेश मिश्रा, अध्यक्ष- अकाेला पूर्व.

विदर्भवादी नेते अनभिज्ञ, शिवसेनाही गाफिल
दिव्य मराठी विशेष
बातम्या आणखी आहेत...