आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"महास्वच्छता'ने प्रजासत्ताक दिनाचे स्वागत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रजासत्ताक दिनाचे स्वागत अत्यंत स्वच्छ सुुंदर वातावरणात व्हावे, या उद्देशानेे जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार संपूर्ण जिल्ह्यात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ सोमवारी सकाळी डोंगरगाव, मासा उदेगाव या दोन गावांत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवंेंदर सिंह यांच्या उपस्थितीत झाला.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत गावस्तरावरील शासकीय कार्यालये, शाळा, अंगणवाडी परिसर, गावामधील परिसर स्वच्छता करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीच्या पत्रान्वये सर्व गटविकास अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना दिल्या होत्या.
त्यानुसारया कार्यक्रमाचे नियोजन सर्वत्र करण्यात आले. जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामस्थांशी पाणी स्वच्छता सुविधासंदर्भात संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वैयक्तिक शौचालय नसलेल्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला. पाण्याच्या टाकीत ब्लिचिंग पावडर टाकणे टाकीची साफसफाई होते की नाही, हे जाणून घेतले. या वेळी जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुटखा तंबाखूचे व्यसन करणाऱ्या ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांना तंबाखू, गुटख्याचे दुष्परिणाम सांगितले. नंतर त्यांच्याकडून व्यसन सोडण्याची शपथ घेतली. ही शपथ उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुळकर्णी यांनी दिली. कार्यक्रमात जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मनोहर तुपकर, गटविकास अधिकारी देवीदास बचुटे, विस्तार अधिकारी देशमुख, जिल्हा पाणी स्वच्छता मिशनचे राजेश डहाके, राहुल गोडले, शाहू भगत, ग्रामसेवक थोरात उपस्थित होते.