आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेल्हारा नगरपालिकेच्या आठ प्रभागांसाठी काढण्यात आली सोडत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पालिकेच्या सभागृहात शनिवारी सकाळी ११ वाजता प्रभागनिहाय जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गजानन निपाणे आणि मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
मूर्तिजापूर शहराची लोकसंख्या ४० हजार २९५ असून, यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या हजार ४४८, अनुसूचित जमातीची लोकसंख्या ९५० आहे. पूर्वीच्या पाच प्रभागांऐवजी या वेळी दोन सदस्यीय १० तीन सदस्यीय १, असे एकूण ११ प्रभाग असून, २३ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. यापैकी महिलांसाठी राखून ठेवावयाच्या जागांसह अनुसूचित जातीसाठी राखून ठेवावयाच्या एकूण जागा ४, तर अनुसूचित जमातीसाठी जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या एकूण जागा आहेत. या अनुषंगाने नगरपालिकेच्या सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. या वेळी लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये एकूण २३ जागांमधून ५० टक्क्यांप्रमाणे १२ जागा महिलांसाठी राखीव आहेत.
आरक्षण प्रक्रियेदरम्यान नायब तहसीलदार अरुण बन्सोड, प्रशासकीय अधिकारी जगदीश कुंभेकर, अभियंता पी. व्ही. पोटे, राजेश भुगूल, सुभाष म्हैसने, विजय कोरडे, सुनील सरोदे, नरेंद्र फुरसुले, नितीन शिंगणे, नारायण खडसे, बसंती यादव, विलास वनस्कार यांच्यासह नगरसेवक, माजी नगरसेवक नागरिक उपस्थित होते.

प्रभागनिहाय राखीव जागा अशा : प्रभागमध्ये अनुसूचित जाती महिला, मध्ये सर्वसाधारण, प्रभाग मध्ये अनुसूचित जमाती, मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग, मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मध्ये सर्वसाधारण, प्रभाग मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग मध्ये अनुसूचित जाती महिला, मध्ये सर्वसाधारण, प्रभाग मध्ये अनुसूचित जाती, मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मध्ये सर्वसाधारण, प्रभाग मध्ये अनुसूचित जाती, मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग १० मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, मध्ये सर्वसाधारण महिला, प्रभाग ११ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, मध्ये सर्वसाधारण महिला, मध्ये सर्वसाधारण अशा राखीव जागा राहणार आहेत.
प्रतिनिधी | अकोट
नगरपालिकानिवडणुकीसाठी शनिवारी प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीमुळे अनेकांच्या इच्छेवर पाणी फेरले गेले आहे. इच्छुकांनी आता समीकरणांची फेरमांडणी करण्यास सुरुवात केली आहे. अकोट पालिकेचे १६ प्रभाग आहेत. यापैकी १५ प्रभागांमधून प्रत्येकी दोन सदस्य, तर १६ व्या प्रभागातून तीन सदस्य निवडले जाणार आहेत.
अनेकांचीनिराशा : मागीलदोन वर्षांपासून प्रभागाची बांधणी करणाऱ्या अनेकांची निराशा झाली आहे. महिला आरक्षण निघाल्याने पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी काहींनी केली आहे. पालिकेत ठाण मांडून बसलेल्या दिग्गजांची या सोडतीमुळे निराशा झाली आहे.
प्रभागनिहायआरक्षण असे : प्रभागक्रमांक नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्रभाग सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्रभाग सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग १० नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग ११ नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग १२ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग १३ सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, प्रभाग १४ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्रभाग १५ अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग १६ अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला असे आरक्षण काढण्यात आले.
प्रतिनिधी | तेल्हारा
स्थानिकनगरपालिकेच्या आठ प्रभागांसाठी शनिवारी आरक्षण सोडत काढण्यात आली.
यामध्ये प्रभाग क्रमांक मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण, प्रभाग अनुसूचित जमाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग अनुसूचित जाती, सर्वसाधारण महिला, प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण महिला, प्रभाग अनुसूचित जाती महिला, सर्वसाधारण, प्रभाग अनुसूचित जाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे.
दरम्यान, या आरक्षण सोडतीनंतर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या काहींसमोर पेच निर्माण झाला आहे. त्यांनी आता नव्याने काही पर्याय शोधण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.
-------------
बातम्या आणखी आहेत...