आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षित पाणी उचल जवळपास पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मागीलवर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने नोव्हेंबर महिन्यात काटेपूर्णा प्रकल्पातील त्या वेळी उपलब्ध जलसाठ्यातून अकोला पाणीपुरवठा योजनेसाठी १५ जुलैपर्यंत आरक्षित केलेल्या पाण्याची जवळपास उचल झालेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाऊस झाल्यास शहरासह ग्रामीण भागाला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात जलप्रकल्पांतील उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन पाणीपुरवठा योजना आणि सिंचनासाठी पाणी आरक्षित केले जाते. आचारसंहितेमुळे आरक्षण निश्चित करता आले नाही. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन पाण्याचे आरक्षण करण्यात आले. मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे निर्गुणा आणि वान प्रकल्प वगळता इतर प्रकल्पांमध्ये ५० टक्केही जलसाठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे काटेपूर्णासारख्या मोठ्या प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडता जिल्ह्यातील विविध पाणीपुरवठा योजनांसाठी पाण्याचे आरक्षण करण्यात आले. जून महिन्यात पावसाने दडी मारली तरी जुलै महिन्यात पाऊस होईल, या अपेक्षेने १५ जुलैपर्यंत पाण्याचे आरक्षण करण्यात आले होते. काटेपूर्णा प्रकल्पात अकोला पाणीपुरवठा योजनेसाठी २४ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. तूर्तास यापैकी वर्षाकाठी २० दशलक्ष घनमीटर पाण्याची उचल केली जाते. त्यामुळेच नोव्हेंबरला पाण्याचे आरक्षण करताना अकोला शहरासाठी १५ जुलैपर्यंत १४.४९ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले. या आरक्षित पाण्यापैकी जवळपास सर्वच पाण्याची उचल १५ जुलैपर्यंत झालेली आहे. संपूर्ण उचल झाली असली, तरी जोपर्यंत काटेपूर्णा प्रकल्पात जलसाठा उपलब्ध आहे, तोपर्यंत शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे

प्रकल्पांतील जलसाठा असा
या प्रकल्पांनी गाठला मृतसाठा

मोऱ्हळ,हातोला, तुळजापूर, कसुरा, तामसी, दगडपारवा, शिवण खुर्द, उमा, भिलखेड, धारुर, पिंपळशेंडा, सावरखेड, जनुना, घोटा, झोडगा यांनी मृतसाठ्याची पातळी गाठली आहे.
महिन्याकाठी १.६४ दलघमीची उचल : मनपानेमहिन्याकाठी १.६४ दलघमी पाण्याची उचल केली. नोव्हेंबर ते १५ जुलै यादरम्यान पाणीपुरवठा करावा लागणार आहे. ही बाब स्पष्ट असताना होणारी उचल कमी केली असती तर आरक्षित जलसाठ्यातून अद्यापही काही दिवस पाणीपुरवठा झाला असता.

तरीही ठरावाकडे दुर्लक्ष : मोर्णातीलदलघमी आरक्षित पाण्याची उचल केल्याने तसेच हे आरक्षण संपुष्टात आल्यानंतरही आरक्षण वाढवून घेण्याकडे तसेच मोर्णा प्रकल्प ते महान जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याच्या प्रस्तावाकडे २०१० पासून दुर्लक्ष केले जात आहे.

टँकरने करावा लागेल पाणीपुरवठा : २००४-२००५या वर्षी शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. त्या वेळी शहराच्या प्रत्येक भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. आताही येत्या काही दिवसांत पाऊस झाल्यास काही भागांमध्ये पाणीपुरवठा करावा लागू शकताे.

तांत्रिक कारणांमुळे दिवस वाढवला : प्रकल्पात१५ जुलैपर्यंत केलेले आरक्षण लक्षात घेऊन महापालिकेने पाणीपुरवठ्यात कपात केली नाही. तांत्रिक कारणांमुळे पाणीपुरवठा पाच दिवसांवरून सहा दिवसांवर आणला, तर अद्यापही कपात करण्याचा निर्णय घेतलेला नाही.
१४ दलघमी पाण्याची उचल

नोव्हेंबरपासूनआरक्षित केलेल्या १४.४९ दलघमी पाण्यापैकी १५ जुलैपर्यंत महापालिका पाणीपुरवठा योजनेने १४ दलघमी पाण्याची उचल केली आहे. त्यामुळे आता आरक्षित पाण्यापैकी केवळ ०.४९ दलघमी पाणी शिल्लक राहिले आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.

लिकेजकडे केले दुर्लक्ष
नोव्हेंबर महिन्यात शहरासाठी आरक्षित केलेला जलसाठा लक्षात घेऊन प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे होते. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाने तसेच पदाधिकाऱ्यांनी शहरात विविध ठिकाणी सातत्याने होणाऱ्या लिकेजकडेही लक्ष दिले नाही. परिणामी, लाखो लीटर पाणी गटारात वाहून गेले.

काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा लक्षात घेऊन पाणीपुरवठा एक दिवसाने वाढवण्याचा प्रस्ताव आहे. पाणीपुरवठा सात दिवसांआड करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तीन दिवसांत पाऊस झाल्यास या प्रस्तावाची अंमलबजावणी करावी लागेल.'' सुनीलकाळे, कार्यकारी अभियंता,

बातम्या आणखी आहेत...