आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Restructuring Of Loans To Various Banks Stopped Crop Loans

विविध बँकांकडून पीक कर्जाचे पुनर्गठन थांबले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांना निवेदन देताना शेतकरी.)
अकोला- शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात बँकांकडून दिरंगाई होत आहे. अद्यापही अतिवृष्टीच्या पॅकेजची रक्कम मिळाली नाही. बँकांकडून पीक कर्जाचे पुनर्गठन थांबल्याची तक्रार शेतकरी जागर मंचने जिल्हाधिकाऱ्यांकडे जुलै रोजी केली.
जिल्ह्यातील शेतकरी तीन वर्षांच्या नापिकीमुळे आर्थिकदृष्ट्या हवालदिल झाला आहे. या वर्षीही पेरणीनंतर पाऊस आला नाही. उर्वरित पेरणीही खोळंबली आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी सन २०१४ २०१५ या वर्षाचे थकित असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज गठन केले काही चालू आहे. पण, अद्यापही जिल्हा सहकारी बँकेकडून एकाही शेतकऱ्याच्या कर्जाचे पुनर्गठन झाले नाही.

कर्जाचे पुनर्गठन २०१० पासून करण्यात यावे. तसेच मागील वर्षाची अतिवृष्टीच्या पॅकेजची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित मिळावी, अशी मागणी शेतकरी जागर मंचाने केली आहे. यावेळी मनाेज तायडे, जगदीश मुरुमकार, प्रल्हाद वैराळे, संजय वानखेडे, महादेव वानखेडे, अशाेक वानखेडे, नितीन गवई, अमृता गाेपनारायण, गजानन विल्हेकर, पांडूरंग साबळे, बाळू मुरुमकार, अशाेक चक्रनारायण, दिलीप गावंडे, माेहन गावंडे, माणिकराव पाेहरे, विजय गावंडे यांच्यासह शेतकरी जागर मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते जिल्ह्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.

बाजार समितीची निवडणूक घ्या
विविधकार्यकारी सहकारी संस्था ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमानंतर अकोला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक घेण्यात यावी मतदार यादी प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी जागर मंचाने केली आहे. हा निवडणूक कार्यक्रम सप्टेेंबर-ऑक्टोबरमध्ये घेतल्यास उमेदवार मतदाराला निवडणुकीमध्ये भाग घेण्यास अडचण राहणार नाही कोणीही कोणत्याही कारणास्तव मतदानापासून वंचित राहणार नाही, असे शेतकरी जागर मंचाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.