आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलढाणा: ट्रेलर- दुचाकी अपघातात वडील जागीच ठार मुलगी गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदुरा- मालवाहू ट्रेलर दुचाकीच्या झालेल्या अपघातात वडील जागीच ठार मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना १५ एप्रिल रोजी रात्री १० वाजेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा येथे गावंडे शो रुम समोर घडली. नांदुरा शहरातील दुर्गा नगर येथील रहिवासी प्रकाश नारायण अंभोरे वय ५५ हे आपली मुलगी पल्लवी सोबत मोटारसायकल क्रमांक एम. एच. २८/ एडी./ ८९६५ ने दुर्गा नगर येथे आपल्या घरी जात होते. 

दरम्यान जळगाव खान्देशकडे जाणारा ट्रेलर क्रमांक एम. एच. ४३/ बीबी/ ०५९५ ने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की यात प्रकाश अंभोरे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन शरीराचे अवयव स्वत: जमा करून उत्तरीय तपासणी करिता रुग्णवाहिकेद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले. मुलीला खामगावला हलवले.
बातम्या आणखी आहेत...