आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रस्त्याचे काेटी अखर्चित; संपूर्ण नियाेजन ‘खड्ड्यात’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - इच्छाशक्ती नियाेजनाअभावी ग्रामीण भागातील रस्ते देखभाल दुरुस्तीसाठीचा गत दाेन वर्षांचा एकूण काेटी ९० लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिला असून, रस्त्यांची दुरवस्था झाली अाहे. एेन पावसाळ्यात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल हाेत अाहेत. नियाेजनाच्या ‘दुष्काळा’चा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत अाहे.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दुरवस्था झाली अाहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे रुग्ण वृद्धांचे प्रचंड हाल हाेतात. रुग्णाला रुग्णालयापर्यंत पाेहाेचवण्यासाठी कसरत करावी लागते. रस्त्यांची दुरुस्ती नियमित देखभाल हाेण्यासाठी अनेकदा ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदने दिली. काही ठिकाणी अांदाेलनेही झाली. मात्र, तरीही रस्ते देखभाल, दुरुस्तीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा अाराेप ग्रामस्थांमधून हाेत अाहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती देखभालीसाठी जिल्हा परिषदेच्या सेस अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येते. मात्र, या तरतुदीनुसार निधी खर्च हाेत नसल्याचे दिसून येत अाहे. हा निधी खर्च हाेऊन रस्ते दुरुस्त व्हावेत, यासाठी लाेकप्रतिनिधी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून हाेत अाहे.

शेतात जाण्यासाठी कसरत : सध्याग्रामीण भागात जाेरात पाऊस सुरू अाहे. गत अाठवड्यात अनेक ठिकाणी जाेरदार पाऊस झाला. काही गावांमध्ये चिखलामुळे ग्रामस्थांना चालताना कसरत करावी लागत अाहे. अनेक ठिकाणी तर शेतातही जाता येत नसल्याचे चित्र अाहे.

सभेतहीमुद्दा गाजला : रस्त्यासाठीचािनधी अखर्चित राहिल्याचा मुद्दा मेमध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही गाजला हाेता. सदस्यांनी निधी अखर्चित का राहिला, असा सवाल उपस्थित केला हाेता. त्यामुळे नंतरच्या काळात पावसाळ्यापूर्वीच सर्व रस्त्यांची दुरुस्ती हाेईल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे अाहे.
इमारतीचानिधी अखर्चित : जिल्हापरिषद इमारत देखभाल दुरुस्तीसाठी सन २०१६-१७ मध्ये काेटी रुपयांची तरतूद करण्यात अाली. तसेच सन २०१५-१६मधील ४० लाख रुपये अखर्चित राहिले.

जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येणाऱ्या याेजनांचा लाभ सर्वच लाभार्थींपर्यंत पाेहाेचत नसल्याचा अाराेप नेहमीच हाेताे. ग्रामीण भागातील रस्ते देखभाल दुरुस्तीसाठी जि. प. सेसमधून काेट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येते. काही वेळा लालफीतशाहीच्या कारभारामुळे निधी अखर्चित राहताे, तर काही वेळा निधीचा अपहार हाेत असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळत नाही. काही महिन्यांपूर्वी बाेरगावमंजू पाेलिस ठाण्यात रस्ता बांधकाम अपहार झाल्याप्रकरणी अधिकारी, अभियंत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. या गुन्ह्यात काहींना अटक करण्यात अाली हाेती.
बातम्या आणखी आहेत...