आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयिताकडून ५७ हजार जप्त, बोरगावमंजूतील पोलिस कर्मचाऱ्याची सतर्कता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बोरगावमंजू- येथील बसस्थानकाच्या मागे एका संशयित व्यक्तीकडून ५७ हजार १३० रुपये असलेली बॅग जप्त करण्यात आली. ही कारवाई कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर मेंढे यांनी शनिवार, १७ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता केली.

आज दुपारी बसस्थानकामागे एक व्यक्ती आपल्या बॅगमधील सामान बाहेर काढून फेकत असल्याचे कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर मेंढे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मेंढे यांनी त्या व्यक्तीकडे धाव घेत त्याची चौकशी केली असता, असमाधानकारक उत्तरे मिळाली. मेंढे यांनी त्याच्या बॅगची तपासणी केली असता ५०० १०० रुपयांच्या नोटांचे बंडल दिसून आले. त्यामुळे त्याला दुचाकीवरून पोलिस ठाण्यात आणले ठाणेदार भास्कर तवर आणि एसडीपीओ नंदकुमार काळे यांच्यासमोर बॅगची झडती घेतली असता, बॅगमध्ये ५०० रुपयांच्या ८३, शंभर रुपयांच्या ९८, पन्नास रुपयांच्या ५९, आणि दहा रुपयांच्या २८८ नोटा, असे ७५,१३० रुपये आढळून आले. चौकशीत निखिल अनिल राणे (वय २३, रा. कोथळी जि. जळगाव खान्देश) असे नाव सांगितले. याप्रकरणी अधिक तपास पीएसआय युवराज उईके त्यांचे सहकारी करत आहेत.