आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय जनता पक्षाच्या औद्योगिक सेलच्या जिल्हाध्यक्षाकडे भरदिवसा चोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भारतीय जनता पार्टीच्या औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष संजय चौधरी यांच्या घर चोरट्यांनी बुधवारी भरदिवसा फोडले. त्यांच्या घरातून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तर दुर्गा चौकातही एका घरात चोरट्यांनी चोरी करून ३६ हजार रुपये चोरून नेले. या प्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
जिल्ह्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला आहे. पोलिसांचा वचक कमी झाल्याने चोरअे सरसावले आहेत. बुधवारी जिल्ह्यात चार चोरीच्या घटना घडल्या. त्यात शहरात तीन घटना आहेत. रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या ह्द्दीतील पवनसुत्र अपार्टमेंटमध्ये संजय चौधरी राहतात. बुधवारी त्यांचे नातेवाईकांच्या अंतिम संस्कारासाठी सहकुटुंब गेले होते. तर मुलगा शाळेत गेला होता. दुपारी वाजता चोरट्यांनी त्यांच्या घराला लक्ष्य करीत दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. 
 
यावेळी त्यांच्या घरातील चांदीचे भांडे, देवीच्या मुर्ती, एक सोन्याची अंगठी ५० हजार रुपयांचे बेंटेक्सचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. चौधरी संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. या घटनांमुळे रामदासपेठ पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. 
 
दुर्गाचौकात घर फोडले 
दुर्गाचौकात प्रमिला राजकुमार सोटे यांचे घर आहे. त्या बाहेर गेल्या असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरातील ३६ हजार रुपये चोरून नेले. विशेष म्हणजे ही घटनासुद्धा बुधवारी दुपारीच घडली. 
 
आश्रयनगरमध्ये दुपारी चोरी 
डाबकीरोड येथील आश्रय नगरमध्ये असलेल्या वैष्णवी संकूल अपार्टमेंटमधील रहिवासी दिपक मराठे यांच्या निवासस्थानी बुधवारी दुपारी अज्ञात चोरटयांनी प्रवेश करीत घरातील कपाटामधील रोखरक्कम दागीने असा एकून एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. 
 
बातम्या आणखी आहेत...