आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरटे पोलिसांना ठरले भारी, भरदुपारी पोलिसाच्‍या घरी सव्‍वा लाखाची चोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसाच्या घरात चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकलेले साहित्य. - Divya Marathi
पोलिसाच्या घरात चोरट्यांनी अस्ताव्यस्त फेकलेले साहित्य.

अकोला - जिल्ह्यात सातत्याने लूटमार, चोरीच्या घटना घडत असताना पोलिस यंत्रणा हातावर हात ठेवून असल्याने चोरट्यांची हिंमत वाढली असून, याचा प्रत्यय बुधवारी शहरात आला. चोरट्यांनी दुपारी १२ च्या सुमारास डाबकी रोड येथील फाळके नगरातील पोलिसाचेच घर फोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला.पोलिस कर्मचारी सकाळी साडेदहा वाजता घरून पोलिस ठाण्यात जात नाही तीच ही घटना घडली. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा करते तरी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

 

बुधवारी सकाळी सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत माधव वक्टे यांच्या घरी चोरांनी मोठी चोरी करत एक लाख रुपयांचे सोने पंचवीस हजार रुपयांची रोख लंपास केली. दरम्यान, डाबकी रोड पोलिसांनी तपास सुरु केला असून, श्वान पथक, ठसे तज्ज्ञांचे पथक स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून चौकशी सुरु केली आहे.

 

१५ दिवसांनंतर पुन्हा फोडले पोलिसांचेच घर : मलकापूरमध्ये रवींद्र लाेखंडे, गीता नगरात चाकूच्या धाकावर लुट तर रेल्वेच्या पोलिस उपनिरीक्षकाचे घर चोरट्यांनी फोडले होते. या घटनेनंतरनाही पुन्हा पोलिसाच्या घरी चोरी झाली आहे.

 

शहर पोलिसांच्या विश्वासार्हतेेवर प्रश्न
शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेवरचा विश्‍वास उडत चालला असून रोज मोठ्या प्रमाणात चेन ओढणे, घरातील दागिणे लंपास करणे, मोबाईल चोरी, जबरी चोरीच्या घटना घडत असून यावर अंकुश कधी कोण लावणार असा प्रश्‍न सामान्य जनतेला पडला आहे.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, दरोड्याच्या प्रयत्नातील पाच संशयितांना पकडले...

 

बातम्या आणखी आहेत...