आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वेच्या एसीच्या डब्यामधून महिलेची सोन्याची पोथ पळवली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रेल्वेच्या एसी डब्यामध्ये बसलेल्या एका महिलेची सोन्याची ८० ग्रॅम वजनाची पोथ चोरट्याने हिसकावून पळ काढला. ही घटना अकोला रेल्वेस्थानकावर बुधवारी घडली. रेल्वे पोलिसांमध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेस्थानक परिसरात तसेच रेल्वे फलाटावर प्रवासी असुरक्षित असतानाच आता एसीच्या डब्यामध्ये घुसून चोरी करण्याची हिंमत वाढली आहे.

रेल्वे परिसरात मोबाइल चोर पाकिटमारीच्या घटना नेहमीच घडतात. येथे यापूर्वी रेल्वे पोलिसांना मारहाण करण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली आहे. रेल्वे परिसरात चोऱ्या होत असताना आता चोरट्यांनी एसीचे डबे टार्गेट केले आहेत. बुधवारी तिरुपती-अमरावती एक्स्प्रेस तिरुपतीहून १.३० वाजता फलाट क्रमांक वर थांबली. या स्थानकावर गाडीचे इंजिन बदलण्यासाठी गाडी बराच वेळ रेल्वेस्थानकावर थांबते.

नांदेडहून गाडीतील एसी मध्ये निता भंडारी त्यांच्या मुलीसह बसल्या होत्या. त्या अमरावतीला रक्षाबंधनासाठी जात होत्या. गाडी थांबलेली असताना त्यातील टीसी खाली उतरला. या दरम्यान गाडीत चोरटा घुसला. त्याने संपूर्ण डब्यातून फेरफटका मारला अकोटफैलकडच्या दिशेने असलेल्या डब्याचा दरवाजा उघडा करून ठेवला. त्यानंतर त्याची नजर निता भंडारी यांच्या गळ्यातील चेनवर पडली. गाडीतील प्रवाशांना तो रेल्वेचा टेक्निशियन असल्याचा भास व्हावा म्हणून तो फॅन बटने दाबून पाहू लागला. गाडी सुरू होताच त्याने निता यांच्या गळ्यातील सोन्याची ८० ग्रॅम वजनाची साखळी हिसकावली गाडीच्या दरवाजातून उडी मारून पळून गेला. गाडी बरीच दूर गेल्यामुळे महिलेने बडनेरा रेल्वे पोलिसांमध्ये तक्रार दिली. बडनेरा पोलिसांनी तेथे गुन्ह्याची नोंद घेऊन अकोला रेल्वे पोलिसांकडे प्रकरण वर्ग केले. पोलिसांनी महिलेने दिलेल्या चोरट्याच्या वर्णनावरून रेखाचित्र बनवले, त्यानंतर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची ओळखपरेडही घेतली. मात्र, चोरटा सापडला नाही. या प्रकारामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

जीआरपी आरपीएफच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
एसीच्या डब्यामध्ये सुरक्षारक्षक असताना चोर डब्यात कसा शिरला. रेल्वेस्थानकावर गाडी उभी असताना फलाटावर आरपीएफचे कर्मचारी नव्हते काय, रेल्वे पोलिसही काय करत होते. असे एक ना अनेक सवाल रेल्वे पोलिस आरपीएफच्या कार्यप्रणालीवर उपस्थित होतात.
बातम्या आणखी आहेत...