आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांनी चक्क पोलिसांच्याच वाहनावरील ब्रॅन्डेड कंपनीचे ‘लोगो’ पळवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील पोलिसांच्या पेट्रोलींग करणाऱ्या गाडीवरील लोगो चोरीला गेले यासह अन्य एका कारचाही लोगो लंपास करण्यात आला आहे. - Divya Marathi
शहरातील पोलिसांच्या पेट्रोलींग करणाऱ्या गाडीवरील लोगो चोरीला गेले यासह अन्य एका कारचाही लोगो लंपास करण्यात आला आहे.
अकोला- दुचाकी चारचाकी वाहने चोरीला जाण्याच्या घटना नवीन नाहीत; मात्र आता चारचाकी वाहनांचे ब्रॅन्डेड कंपनीचे लोगो चोरून त्यातून पैसे कमवण्याची शक्कल चोरट्यांनी लढवली आहे. शासकीय, निमशासकीय खासगी वाहनांचे इम्पोर्टेड लोगो चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या नव्या करकरीत पेट्रोलिंग कारचेही लोगो गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 

शहरातील बहुतांश वाहनांचे लोगो चोरीला जाण्याच्या घटना उजेडात आल्या आहेत. मात्र, या प्रकरणी कुणी तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नसल्याने कुणावरही कारवाई झाली नाही. सार्वजनिक ठिकाणी, अपार्टमेंटच्या बाहेर, सरकारी वाहनांना टार्गेट करून त्यांचे लोगो काढल्या जात आहेत. खड्ड्यांमुळे लोगो पडला असेल असे समजून वाहनचालक तक्रार करीत नाहीत. लोगो चोरीला गेल्यानंतर त्याच कंपनीचा लोगो शोरुममधून विकत घेऊन वाहनांना लावण्याची वेळ वाहनधारकांवर आली. रामनगरमधील कृष्णा अपार्टमेंटमधील रहिवासी मनीष नारगुंडी म्हणतात, की त्यांच्याही दुचाकीचा लोगो काढण्याचा प्रयत्न झाला हाेता. कारचे लोगो गायब होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने लोगो चोरी करणारे सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांच्या गस्ती वाहनांचे लोगो गायब झाल्याच्या गंभीर प्रकाराची चौकशी करून काय कारवाई होते, यासह अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 

सहज काढता येतो वाहनांवरील लोगो 
शोरूमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनांचे लोगो सहज काढता येतात. कारण ते विशिष्ट गोंदने चिटकवलेले असतात. काही कंपन्यांच्या वाहनांचे लोगो स्क्रुड्रायव्हरनेे दाब दिल्यास काढता येतात. 

मोठ्या प्रमाणात होते ‘लोगो’ची विक्री 
वाहनांचे लोगोसाठी चालक शोरूममध्ये येतात. वाहनपरत्वे लोगोची किंमत ठरते. लोगोची विक्री होते. माझ्या कारचा लोगो चोरीला गेल्याने ९०० रुपयांचा लोगो बसवला. 
- विवेक पारस्कर, उद्योजक 

आजपर्यंत एकही तक्रार दाखल नाही 
वाहनांचे लोगो चोरीला जाणे, गायब होण्याविषयी तक्रार केली नाही. असे असेल, कुणाला काही माहित असल्यास माहिती द्यावी. कारवाई होईल. 
- उमेश माने पाटील, पोलिस उपअधीक्षक शहर 

दोन हजारपर्यंत आहे एका लोगोची किंमत 
गाडी कोणत्या कंपनीची आहे, त्यावरून त्या गाडीच्या लोगोची किंमत ठरते. २०० रुपयांपासून २,००० रुपयांपर्यंत गाडीचे लोगो विकत मिळतात, अशी माहिती कारच्या शोरूममधून मिळाली आहे. 
बातम्या आणखी आहेत...