आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईकडे जाणाऱ्या मुलीला सुखरूप साेडले घरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मुंबईची काहीही माहिती नसलेली १६ वर्षांची मुलगी फिल्मी दुनियेच्या आकर्षणाने मुंबईला निघाली. मुंबईला जाते म्हणून तिने घरी कुणालाही सांगितले नाही. ती रेल्वेस्थानकावर पोहोचली होती. मात्र, तिची संभ्रमावस्था आरपीएफ जवानांनी टिपली.
त्यांनी तिची विचारपूस केली. आपल्याला मुंबईला चंदेरी दुनियेत जायचे आहे, असे ती सांगू लागली. मात्र, तिची विवंचना वेगळीच असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या आईवडिलांचा शोध घेण्यात आला तिला तिच्या वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

सावत्र आई असलेली ती १६ वर्षांची मुलगी शनिवारी रात्री वाजताच्या सुमारास घरातून एकटीच बाहेर पडली. रेल्वे रुळावरून ती चालत रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक वर पोहोचली. पहाटेच्या सुमारास ती मुलगी कावरीबावऱ्या अवस्थेत रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक निरीक्षक आर. एन. यादव कॉन्स्टेबल चव्हाण शफी यांना दिसून आली. त्यांनी तिची विचारपूस केली. मुंबईला चंदेरी दुनियेत करिअर करायचे आहे, असे ती सांगू लागली, तर काही वेळातच वेगळेच काही सांगू लागली. त्यानंतर ती राहत असलेल्या ठिकाणी जाऊन आरपीएफच्या कर्मचाऱ्यांनी तिच्या घराचा शोध घेतला. तिचे वडील आणि नातेवाईकही तिचा शोध घेतच होते. त्यानंतर मुलीचे वडील आणि नातेवाईक रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यानंतर मुलीला त्यांच्या हवाली करण्यात आले.
रेल्वेस्थानकावरआरपीएफचे ठाणे निरीक्षक राजेश बढे
यांनी यापूर्वी मुस्कान अभियान राबवून अनेक मुलामुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. महिनाभरातील चौथी घटना असून, अकोला आरपीएफ हरवलेल्या मुलामुलींना घरी सोडण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. या सतर्कतेमुळे अनेक हरवलेल्या स्वकियांकडे पाेहचले अाहे. पाेलिस विभागाच्या वतीनेही अाॅपरेशन मुस्कानच्या माध्यमातून अनेक हरवलेल्या मुलांना पालकांकडे पाेहचवले अाहे.
बातम्या आणखी आहेत...