आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात 8 लाख रुपयांच्या नोटा जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जुने शहरात शनिवारी रात्री पोलिसांनी चलनातून बाद केलेल्या ५०० रुपयांच्या नोटा जप्त केल्या. यामध्ये काही २००० १०० रुपयांच्या नवीन नोटांचाही समावेश आहे. जप्त केलेल्या नोटांचे मूल्य लाख ८० हजार रुपये आहे.
शनिवारी खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत चलनातून बाद झालेल्या नोटा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर रात्री जुने शहर पोलिसांनीही बाद झालेल्या नोटा पकडल्या. पोलिसांनी नोटा जप्त करून त्या पोलिस स्टेशनला आणल्या. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून चौकशी सुरू होती.

अशाकेल्या नोटा जप्त
नगराध्यक्ष नगरपालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. शनिवारी रात्री नाका बंदी दरम्यान पोलिसांनी वाशीम बायपास येथे एमएच ३० व्ही ३२३५ क्रमांकाची कार थांबवली. पोलिसांनी कारची तपासणी केली. पोलिसांना कारमध्ये लाख ८० हजार रुपये आढळले.

यानोटा केल्या जप्त
जुनेशहर पोलिसांनी चलनातून बाद झालेल्या ५०० रुपयांच्या ६४० नोटा जप्त केल्या. या नोटांचे मूल्य लाख २० हजार रुपये आहे. तसेच लाख ६० हजार रुपये मुल्याच्या नवीन २००० च्या १८० नोटा एक लाख रुपये मूल्य असलेल्या १०० रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या.

तिघांची विचारपूस
नोटा जप्ती प्रकरणी जुने शहर पोलिसांनी डोणगाव येथील गजानन पांडुरंग इंगळे, रमेश दशरथ नवघरे गणेश शिवाजी इंगळे यांची विचारपूस केली. ते कार खरेदीसाठी आले होते. मात्र, शो रूम बंद झाल्याने ते पुन्हा डोणगावकडे निघाले होते. पोलिस हे प्रकरण चौकशीअंती आयकर विभागाकडे हस्तांतरित करण्याची शक्यता आहे.
खातेदार,ग्राहक हैराण
सध्या१० ते १०० नवीन २००० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे. अनेक राष्ट्रीयकृत बँका एका दिवशी ४००० रुपयांपेक्षा जास्त रुपये खातेदाराला देत नाही. ग्राहकाला दुकानदाराकडे सुटे पैसे जमा होण्याची प्रतीक्षा करावी लागते. मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात जप्त केलेल्या नवीन २००० १००० रुपयांच्या नोटा कशा, कोठून आणण्यात आल्या, असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

वरिष्ठ पोलिसांनी लक्ष देणे आवश्यक
नोटाबंदीच्या निर्णयानंतर सिटी कोतवाली परिसरातून चार लाखांपेक्षा जास्त नोटा पोलिसांनी जप्त केल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण आयकर विभागाकडे हस्तांतरीत केले होते. मात्र, पुढे या प्रकरणात कोणती कार्यवाही झाली हे पुढे आले नाही. त्यामुळे जुनेशहर पोलिस ठाणे हद्दीत जप्त झालेल्या नोटांमागील सत्य उजेडात येण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
बातम्या आणखी आहेत...