अकोेला - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अकोला नगराच्या वतीने मंगळवार, ११ रोजी सकाळी विजयादशमीनिमित्त पथसंचलन काढण्यात आले. रामदासपेठेतील क्रीडा संकुलपासून सकाळी वाजताच्या सुमारास संचलनाला सुरुवात झाली. तेथून प्रा. कासट यांचे निवासस्थान, नाना उजवणे निवासस्थान, दर्शन अपार्टमेंट, टिळक पार्क, क्रांती चौक, दत्त मंदिर, व्यंकटेश किराणा, बिर्ला रोड, महाशब्दे हॉस्पिटल, स्टेट बँक शाखा, आठल्ये प्लॉट, शारदा समाज, आेम हॉस्पिटल, दुर्गा चौक, लेडी हार्डिंगमार्गे परत क्रीडा संकुलात पोहोचल्यावर सांगता झाली. रामदासपेठ भागात महापौर उज्ज्वलाताई देशमुख यांनी संचलनावर पुष्पवृष्टी केली. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. संचलनाच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तसेच मार्गावरही नागरिकांनी पुष्पवृष्टी केली. पोलिस बंदोबस्त चोख होता.
नवीन गणवेशात पथसंचलन
संघाचा गणवेश बदलल्यानंतर फूलपँटमधील स्वयंसेवकांचा पहिलाच कार्यक्रम होता. संघाचा विजयादशमी उत्सव रविवार, १६ ऑक्टोबर रोजी आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे.