आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरटीईसाठी आजपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू, प्रवेशासाठी अकाेल्यातील 76 शाळांनी केली नाेंदणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - शिक्षण हक्क अधिनियमानान्वये २५ टक्के शाळा प्रवेशासाठी अकाेला पंचायत समितीअंतर्गत शनिवारी सायंकाळपर्यंत ७६ शाळांची नाेंदणी झाली अाहे. या शाळेत रविवारपासून अाॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु हाेणार अाहे. यंदा ही प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी रविवारपासून राबवण्यात येणार अाहे. 

शिक्षण हक्क अधिनियमानानुसार (अारटीई) दुर्बल वंचित घटकातील २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांना नोंदणी करण्याचे आदेश जानेवारी महिन्यामध्ये दिले होते. फेब्रुवारीपर्यंत शाळांनी या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र ज्या शाळा २५ टक्के प्रवेशाकरीता पात्र आहेत, परंतु नोंदणी करत नाहीत किंवा प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा उपलब्ध करून देणाऱ्या शाळांची मान्यता काढण्याबाबत शिक्षण विभाग नोटीसा देणार आहे. 

असा अाहे प्रवेशाचे वेळापत्रक: ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ फेब्रुवारीपर्यंत चालणार अाहे. त्यानंतर पहिली लाॅटरी २७ २८ फेब्रुवारी राेजी काढण्यात येणार येणार असून, ते मार्च या दरम्यान शाळेत जाऊन प्रवेश घेता येईल. त्यानंतर १० ते ११ मार्च या कलावधीत शाळांनी रिक्त पदांची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागांची नाेंद करावी लागणार अाहे. प्रवेशाची दुसरी लॉटरी १४ मार्च ते १५ मार्च, तिसरी लाॅटरी २४ २५ मार्च, चौथी लाॅटरी एप्रिल अाणि पाचवी लाॅटरी १८ ते २० एप्रिल या कालावधीत काढण्यात येणार अाहे. प्रत्येक लाॅटरीनंतर विहित मुदतीत शाळांना रिक्त पदांची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा दर्शवावी लागणार अाहे, असे शिक्षण विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...