आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरटीओची लवकरच भव्य इमारत, कामकाज संगणकीकृत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (अारटीअाे) कार्यालयासाठी सुसज्य इमारत बांधण्यात येणार असून, संपूर्ण कार्यालयीन कामाचे लवकरच संगणकीकृत हाेणार अाहे, अशी मािहती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी साेमवारी दिली. अकाेला जिल्ह्याच्या दाैऱ्यावर अालेल्या रावते यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कार्याचा अाढावा घेतला.
सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक अायाेजित करण्यात अाली हाेती. बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी जी.श्रीकांत , जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रकिशोर मिणा, मनाप आयुक्त अजय लहाने, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकांत सागर अादी प्रामुख्याने उपस्थित होते.

अकाेला पॅटर्न राज्यभर राबवू :काही दिवसांपूर्वी झालेल्या धार्मिक उत्सवांमध्ये डिजेचा वापर करणाऱ्यांविरुद्ध पाेिलसांनी कारवाई केली हाेती. गणेशोत्सव काळात डी.जे वाजविणाऱ्या वाहनांना आर. टी.ओ. परवाने नाकारण्यात आले हाेते. त्यामुळे गणेशाेत्सवात डिजेचा वापर झाला नाही. उत्सवात पारंपरिक वाद्यांचा बाेलबाेला हाेता. डिजेचा हा पॅर्टन संपूर्ण राज्यात राबविला जाईल, असेही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. जिल्हयामध्ये प्रदुषणमुक्त सण आणि समारंभ साजरे करुन यामध्येपारंपारिक वाद्यांचा उपयोग करुन उत्सवात भव्यता आणता येते असेही मत रावते यांनी व्यक्त केले.

सीटीबसच्या रंगबाबत प्रस्ताव सादर करा
अकाेला शहरात महानगर पालीकातर्फे शहर वाहतूक बस सेवा राबवण्यात येणार अाहे. सीटी बसेस साठी कोणता रंग पाहीजे त्याचा प्रस्ताव महानगरपालीकेने त्वरीत परिवहन कार्यालयाकडे सादर करावा. रंगाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. सीटी बसेसचे रंग बदलविण्यासंबधी नवीन आदेश काढण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री रावते यांनी दिली.यावेळी परिवहन विभागाचे अधिकारी तसेच ईतर संबधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...