आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या आरटीओ कार्यालयाची वाताहत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शासनालावर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या आरटीओ कार्यालयाची वाताहत झाली आहे. कौलखेड मार्गावर एसटी विभागाच्या एकेकाळच्या कॅन्टीनमध्ये मोजक्या जागेत कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. अपुऱ्या जागेमुळे कर्मचाऱ्यांना बसायलाही धड जागा नाही, तर कॅशरूम उघड्यावर आहे. या सर्व प्रकारामुळे आरटीओ कार्यालयाला उतारकरूचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून आरटीओ कार्यालयाला बिकट परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. पूर्णा रेल्वे मार्ग पुलाजवळ असलेल्या इमारतीत आतापर्यंत आरटीओ कार्यालय सुरू होते. परंतु, ही इमारत शिकस्त झाल्याने दुसऱ्या जागेचा शोध आरटीओ कार्यालयाकरिता घ्यावा लागला. दोन ते तीन जागांचा शोध घेतल्यानंतर कौलखेड मार्गावरील एसटी विभागीय कार्यालयाच्या इमारतीत आरटीओ कार्यालय स्थलांतरित करण्यात आले. पूर्वी या जागेत एसटीचे कॅन्टीन होते. एक हॉल, एक केबिन एक छोटी खोली अशा १२०० चौरस फूट जागेत आरटीओ कार्यालय सुरू आहे. कार्यालयात एकूण ४० कर्मचारी कार्यरत अाहेत. तर, फाइल्स कागदपत्रांचा ढिगारा अधिक असल्याने या ढिगाऱ्यात बसूनच कर्मचाऱ्यांना दैनंदिन काम करावे लागते. त्यामुळे कर्मचारीही वैतागले आहेत.

दोन्ही प्रश्नांसाठी पाठपुरावा करू
^आरटीओ कार्यालय जागेचा प्रश्न शासन दरबारी यापूर्वीच मांडला. नवीन तहसील कार्यालय बांधण्याबाबतही राज्याच्या अर्थमंत्र्यांशी चर्चा केली. दोन्ही प्रश्नांसाठी पाठपुरावा केला जाईल.'' गोवर्धन शर्मा, आमदार

अपुऱ्या जागेमुळे उतारकरूचे स्वरूप झाले प्राप्त
अडीच लाख भाड्यावर : १२००चौरस फुटांच्या जागेतील कार्यालयाचे भाडे महिन्याकाठी २० हजार रुपये आहे. त्यामुळे वर्षाकाठी दोन लाख ४० हजार रुपये शासनाला भाड्यावर खर्च करावे लागतात. भाड्यावर एवढे पैसे खर्च करूनही कर्मचाऱ्यांना मात्र कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत.
यापूर्वी दोन जागांचा शोध : आगरकरविद्यालयामागील सर्व शिक्षा अभियानाचे कार्यालय किंवा खोलेश्वर भागातील दूरदर्शनचे कार्यालय कार्यालयासाठी घेण्याबाबत हालचाली सुरू होत्या. परंतु, अग्रसेन चौकातील शाळा, क्रीडांगणावर होणाऱ्या स्पर्धा लक्षात घेऊन विरोध झाला.

आरोग्यासही धोका : सार्वजनिकस्वच्छतागृहाची नियमित साफसफाई होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. दिवसभर दुर्गंधीयुक्त वातावरणात कर्मचाऱ्यांना काम करावे लागते.यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही.
१०० ते १२५ गाड्यांचे पासिंग : दुचाकीते जड वाहनांपर्यंत अशा सर्वच वाहनांची पासिंग या कार्यालयातून होते. सरासरी दिवसाकाठी १०० ते १२५ वाहनांची पासिंग होते. त्याच बरोबर शिकाऊ वाहन परवाना, कायमस्वरूपी वाहन परवाना आदींसाठीही शेकडो नागरिक उपस्थित असतात.
कॅश रूम वाऱ्यावर : सरासरीदररोज १५ लाखांचा महसूल या माध्यमातून शासनाला मिळतो. ही रक्कम कॅश रूममध्ये संकलित केली जाते. त्यामुळे कॅश रूम बंदिस्त असणे गरजेचे आहे. परंतु, कार्यालयातील कॅश रूमही उघड्यावरच आहे.

कार्यालयासाठी खडकी येथे जागा दिलेली असल्याची माहिती आहे. परंतु, केवळ जागा देण्यात आलेली असली, तरी पुढील कार्यवाही मात्र अद्याप काहीही झालेली नाही. तसेच पुढील कार्यवाही होईस्तोवर कार्यालयासाठी प्रशस्त जागा पाहण्यासाठीही कोणी पुढाकार घेतलेला दिसत नाही.
कर्मचारी आहेत कार्यरत