आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी महिला रुग्णालयाबाहेर बाळंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - ग्रामीण रुग्णालयात बाळंत होण्यासाठी आलेल्या आदिवासी शेतमजूर महिलेवर रुग्णालयात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली नसल्यान रुग्णालया बाहेरच बाळंत होण्याची नामुष्की ओढवल्याचा प्रकार सोमवारी पहाटे घडला. जया बाळासाहेब माळी (वय ४१, खानापूर) असे या महिलेचे नाव आहे. आदिवासी समाजातील ही विवाहित महिला पहाटे साडेतीन वाजता अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आली होती. पण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, शिपाई, कर्मचारी आरोग्य सहायक असे कोणीही उपस्थित नव्हते. अखेर पहाटे चारच्या सुमारास रुग्णालयाच्या बाहेर उपचाराशिवाय दरवाजातच ती बाळंतिन झाली. तिने एका गोंडस अर्भकाला जन्म दिला. मात्र या सर्व गोष्टींचा प्रचंड त्रास गरोदर मातेला सहन करावा लागला.
यापूर्वी महिलेला रुग्णवाहिकेसाठी १०८ क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे खासगी वाहनाने त्यांना रुग्णालयात आणावे लागले. पहाटेच्या सुमारास रुग्णालयात येऊनही महिलेला उपचार मिळाल्याने अखेर पहाटे चार वाजता रुग्णालयाच्या बाहेर दरवाजातच ती बाळंत झाली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. यावेळी या महिलेचा पती बाबासाहेब माळी तेथील एका आनोळखी पुरूषांनेच या महिलेला बाळंतीन होण्यासाठी मदत केली. बाळंतीन झालेनंतर महिलेच्या पतीने बाळाची नाळ आईपासून वेगळी करण्यासाठी खासगी वाहनातून बाळंतीन एका हाताने बाळाला धरून अकोले शहरातील डाॅ. सुदाम आरोटे यांच्या खासगी रुग्णालयात आणले तेथे पुढील उपचार करण्यात आले. अकोले ग्रामीण रुग्णालयातील या गैरप्रकारामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याबाबत अगस्ती साखर कारखान्याचे संचालक शिवसेनेचे कार्यकर्ते महेश नवले रमेश राक्षे यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार केली आहे.

संतापजनक बाब
^एका आदिवासी गरीब महिलेची प्रसूती ग्रामीण रुग्णालयात उपचाराशिवाय रुग्णालयाच्या आवारात उघड्यावर दोन पुरुष करतात. तसेच आई अर्भकाला नाळ तुटली नसल्याचे अवस्थेत तेथून खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्याची नामुष्की पत्करावी लागली आहे, ही बाब मनस्वी चीड आणणारी आहे.'' महेश नवले, संचालक, अगस्ती साखर कारखाना.
बातम्या आणखी आहेत...