आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारंजामध्ये सद् भावना फेरीद्वारे शांततेचा संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कारंजा - गेल्याकाही दिवसांत शहरवासीयांनी शांतता आणि सौहार्द ठेवल्यानंतर पोलिस महसूल प्रशासनाच्या वतीने गुरूवार, २३ जुलै रोजी रिमझिम पावसात प्रमुख मार्गावरुन सर्वधर्मिय सद्भावना रॅली काढण्यात आली. त्याद्वारे शांततेचा संदेश देण्यात आला. पोलिस अधीक्षक विनिता साहू यांनी रॅलीचे नेतृत्व केले होते.

शहर पोलिस स्टेशनच्या परिसरातून निघालेल्या रॅलीच्या अग्रभागी उपविभागीय अधिकारी दिनकर काळे, तहसीलदार चेतन गिरासे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे (यवतमाळ), उपविभागीय पोलिस अधिकारी विलास देशमुख, पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाणे, गुन्हे शाखा वाशीमचे राजेश पाटील, सर्वधर्म आपत्कालीन संस्थेचे अध्यक्ष श्याम सवाई होते. रामासावजी चौक, जिजामाता चौक, भारतीपुरा, शिवाजीनगर, जयस्तंभ चौक, टिळक चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, महात्मा फुले चौक मार्गे निघालेल्या रॅलीत नगराध्यक्ष निशा गोलेच्छा, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, अॅड.विजय बगडे, प्रा.डाॅ.केशव फाले, जमा मशिदीचे इमाम अ. मजीद रशीदी जमाली (आलिम साहब), मौली मजहर, काझी मोहम्मद इकबाल, काझी रफ़िउल्लाह, जि.प.सदस्य उस्मान गारवे, दिलीप भोजराज, शरद कऱ्हे,राजीव भेंडे, विभाताई जाधव, जयश्रीताई भुजाडले, डाॅ. प्रज्ञा पाटील, डाॅ.कविता मिसाळ, पुष्पाताई रुणवाल, प्रमिलाताई गाठेकर यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, मशिदीचे काजी, पुजारी, विविध शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, कर्मचारी, ग्रामीण रूग्णालयाचे कर्मचारी, महसूल कर्मचारी, पोलिस यांच्यासह शहरातील पुरूष महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या. रॅलीचा समारोप शहर पोलिस स्टेशन परिसरात करण्यात आला.

तत्पूर्वी, पोलिस अधीक्षक साहू यांनी कारंजा शहरात जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. एका मुलीच्या छेडखानीवरून शहरात मंगळवारी (ता.१४) रोजी जातीय तणाव निर्माण झाला होता. तो दूर झाला, वातावरण निवळले.

गवळी समाजातर्फे शिरखुर्म्याचे वाटप
कारंज्यातीलगवळी समाजाच्या वतीने रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांना शिरखुरमाचे वाटप करण्यात आले. स्थानिक शिवाजी महाराज पुतळा परिसरात हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध पोलीस कर्मचारी तथा महसूल कर्मचा-यांनी शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमासाठी कय्युम जट्टावाले, विविध कार्यकारी