आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर केवळ २० रुपयांत पोटभर जेवण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मनावर घेतले तर काहीही होऊ शकते, याचे जिवंत उदाहरण बघायचे असेल, तर नेहरू पार्क चौकातील ‘सद्गुरू कृपा’ला भेट द्या. या टपरी-वजा-प्रतिष्ठानच्या संचालकाने पुरी-भाजीच्या व्यवसायातून अनेकांची क्षुधा शांती तर केलीच शिवाय स्वत:सह तब्बल २१ कुटुंबांना जगण्याचा आधार मिळवून दिला आहे. अशोक रामभाऊ बनकर हे त्याचे नाव.
वाया गेलेला पोरगा म्हणून २० वर्षांपूर्वी सर्वजण त्याची हेटाळणी करत. आता मात्र तोच व्यक्ती निर्व्यसनी झाला असून, वारकरी बनला आहे. अशोकने स्वत:च बदलायचे ठरवले. त्याने केवळ एक किलो पिठाच्या पुऱ्या करून स्वत:च जेवण पुरवण्याचे काम सुरू केले. आज दीड क्विंटल पिठाच्या पुऱ्या करूनही त्याची ग्राहकी संपत नाही. दररोज सकाळी ११ ते या वेळेत अशोकच्या ‘सद्गुरू कृपा’मध्ये ग्राहकांची रांग लागते. केवळ दहा रुपयांत आठ पुऱ्या आणि सोयाबीन वड्यांची प्लेटभर भाजी मिळते. आणखी थोडे पैसे मोजले, तर जिरा राइस आणि पापडही प्राप्त करून घेता येतो. सामूहिक कुटुंब पद्धतीने अशोक हा व्यवसाय चालवतो. त्याच्यासोबत काम करणारे सहकारी ज्यामध्ये आठ महिला आणि इतर पुरुषांचा समावेश आहे, तब्बल २१ कुटुंबांचे सदस्य आहेत. अर्थात या सर्वांच्या घराचा गाडा या छोट्याशा व्यवसायाच्या आधारेच चालतो. या सेवाभावी कामासाठी अशोकला पुण्याच्या खाऊ गल्लीतील संस्थेने दोनदा प्रमाणपत्र देऊन त्याचा गौरव केला आहे.

देवाला देतो धन्यवाद
काही वर्षांपूर्वी पत्नी मला कंटाळून माहेरी परतली होती. आता तीच इतरांना सांगते की, असा नवरा दिवा घेऊन शोधावा लागतो. वीस वर्षांत माझ्यात झालेला हा बदल अद््भुत आहे. त्यासाठी मी देवाला धन्यवाद देतो. मी आता वारकरी झालो आहे.'' - अशोकबनकर

"व्यसनाधीन ते निर्व्यसनी'पर्यंत प्रवास; आता जनसेवेवर भर
समाजहितार्थ काम करणाऱ्या अशोककडे अजूनही स्थानिक सामाजिक संस्था किंवा शासकीय यंत्रणेचे लक्ष गेले नाही. त्यांनी मदत केल्यास २० रुपयांत पोटभर जेवण पुरवण्याची अशोकची योजना आहे. जागा कर्जाऊ रक्कम मिळाल्यास स्वस्त गुणवत्तापूर्ण जेवण पुरवणारा व्यक्ती म्हणून मी पुढे येईन, असे तो सांगतो.