आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: संत चोखा मेळा यांच्या जन्म स्थळाची अक्षरश: लक्तरं!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देऊळगावमही (जि. बुलडाणा) -

ऊसडोंगा परी रस नोव्हे डोंगा।
काय भुललासी वरलीया रंगा ।।
भयाणउजाड परिसर. औदुंबराच्या झाडाखाली चार दोन दगडी विटा. शेंदूर लावलेले दोन दगड. त्यावर कुजलेले हार. बाजूला एक लहानशी मूर्ती. ही मूर्ती आहे महान संत चोखा मेळा यांची आणि हे वर्णन आहे त्यांच्या मेहुणाराजा या जन्मगावचे.
देऊळगावमहीपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक वारसा तसेच संताच्या पावनभूमीत झालेल्या मेहुणाराजा येथे संत चोखा मेळा यांचा ७४८ वा जन्मोत्सव सोहळा गुरुवार, १४ जानेवारी रोजी साजरा होत आहे. मात्र, दरवर्षी केवळ राजकीय पुढारी येथे येऊन घोषणा करून मोकळे होतात आणि विकासाच्या दृष्टीने कोणतेच पाऊल उचलले जात नसल्याची स्थिती संत चोखा मेळा जन्मस्थानाची झाली आहे. महाराष्ट्राचे महान विचारवंत कवी, कीर्तनकार, विठ्ठलाचे निस्सीम भक्त संत चोखा मेळा यांचा जन्मोत्सव दरवर्षी जिल्हा परिषद बुलडाणा आणि पंचायत समिती देऊळगावराजा यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केला जातो. मात्र, शासनस्तरावर दरवर्षी होणारा उत्सव हा जिल्हा परिषद, पंचायत समिती शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सक्तीची भक्ती, अशा स्वरूपात साजरा करण्यात येतो. त्यामुळे हा उत्सव सक्तीचा नाही, तर भक्तीचा लोकोत्सव व्हावा, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. १९९७ मध्ये तत्कालीन जि. प. अध्यक्ष, माजी जि. प. सदस्य बाबरावजी नागरे, संत चोखा मेळा अभ्यासक कमलेश खिल्लारे गावकऱ्यांनी या उत्सवाला सुरुवात केली होती. तत्पूर्वी तत्कालीन समाजकल्याण मंत्र्यांनी या उत्सवाला सुरुवात केली होती. मात्र, राजकीय तसेच शासकीय उदासीनतेपोटी हा उत्सव बंद झाला होता. नंतर विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ, बाबुराव नागरे, प्रा. खिल्लारे, जन्मोत्सवाचे मुख्य प्रवर्तक पुढे अाल्याने या उत्सवाला पुन्हा सुरुवात झाली.

फक्त घोषणाच विकासकामे नाही : संत चोखा मेळा जन्मभूमीत फक्त राजकीय पुढाऱ्यांच्या घोषणा, शासनाची उदासीनता, यामुळे विकासकामे झाल्याने अजूनही हे जन्मस्थळ उपेक्षित आहे. बुलडाणा जिल्ह्याचे आनंदराव अडसूळ खासदार असताना मेहुणाराजा येथे त्यांनी फक्त सभामंडप दिले होते. नंतर मात्र, राजकीय पुढाऱ्यांनी आश्वासनाव्यतिरिक्त ठोस विकासकामे केल्याने हे जन्मस्थळ उपेक्षित आहे.

या कामांची प्रतीक्षा
येथीलनिर्मल नदीचे खोलीकरण, बँका आणि निर्मला या संताच्या समाधीचे सुशोभीकरण, औषधीयुक्त वनस्पतींनी वेढलेल्या चर्मरोग बरे करणारे ऐतिहासिक कुंडाचे खोलीकरण व्हावे, जन्मोत्सव ठिकाणी संत चोखा धरणातून कायमस्वरूपी पाणी, तसेच जलकुंभ व्हावा, तीन ते चार हजार भाविक बसतील, असा सभामंडप व्हावा, संत चोखा यांचे भव्य मंदिर उभारावे, प्रवेशद्वाराचे जतन तसेच सुशोभीकरण करावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.