आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीन पार्श्वनाथ सैतवाळ दिगंबर मंदिर,शहरात किल्ल्याजवळ नायकवाडीपुऱ्यात एेतिहासिक मंदिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरात किल्ल्याजवळ नायकवाडीपुऱ्यात असणारे श्री पार्श्वनाथ सैतवाळ दिगंबर मंदिराची स्थापना झाल्याची निश्चित असा लेखी पुरावा नाही. पण जैन मान्यतेप्रमाणे मूर्तीवरील सालाप्रमाणे ते ३५० वर्षे पुरातन असावे. नझूल रेकॉर्ड नोंदीत १९०७ मध्ये बाळाभाऊ सदाशिव उन्हाने आणि पांडोबा सदोबा उन्होने यांची पंच म्हणून नोंद आहे. त्यानंतर १९४० मध्ये कृष्णराव मुरकुटे, शांताराम बापूजी उन्होने, चिंतामणराव इंगोले गुरुजी नारायण मार्तंड आगरकर हे पंच म्हणून आले आणि त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. या मंदिरात एकंदर २४ मूर्ती असून मंदिराचे एक वाचनालय आहे. मंदिराचे ट्रस्टी अनेक वर्षांपासून मंदिराच्या विकासासाठी कार्य करत अाहेत.
महावीर जयंती निमित्त मंगळवार, १९ एप्रिल रोजी शहरात सकाळपासून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० वाजता गांधी जवाहर बाग येथील महावीर स्तंभाजवळ पूजन करण्यात येणार असून, सकाळी ९.३० वाजता शहरातील प्रत्येक मंदिरात महावीर जन्मोत्सव, अभिषेक करण्यात येणार आहे. सायंकाळी ४.३० वाजता सेणगन दिगंबर जैन मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

सेणगन मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात होऊन सिटी कोतवाली चौक मार्गे कपडा बाजार, जैन मंदिर मार्गे गांधी चौक, सिटी कोतवाली चौक येथून किल्ल्याजवळील श्री पार्श्वनाथ सैतवाळ दिगंबर मंदिरात समारोप होणार आहे. यासोबतच शहरातील प्रत्येक मंदिरात कार्यक्रमांनी महावीर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे.