आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साजिद खान यांनी घडवले हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेचे विरोधीपक्ष नेता साजिद खान पठाण हे शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये हिंदू बांधवांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले. त्यांच्या उपस्थितीने हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडल्याचे अकोलेकरांनी अनुभले. अकोल्याच्या समाजमनात पहिल्यांदाच अशा प्रकारचे चित्र पाहायला मिळाल्याने शिवाजी महाराजांचे विचारांच्या परिवर्तनाची नांदी ठरली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रेमध्ये पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, महापौर उज्ज्वला देशमुख यांच्यासह शिवप्रेमींची उपस्थिती होती. मात्र, पहिल्यांदाच या शोभायात्रेमध्ये महापालिकेचे विरोधी पक्ष नेता साजिद खान पठाण यांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती. पठाण यांच्या उपस्थितीमुळे सर्व समाज घटकांमध्ये तसेच हिंदू-मुस्लिम यांच्यात सामाजिक समतेचा संदेश गेला. त्यांच्या उपस्थितीचे अनेकांनी भरभरून कौतुक केले.

मुशायरानेघडवले धर्मनिरपेक्षतेचे दर्शन : शिवजयंतीमहोत्सवाच्या निमित्ताने ऑल इंडिया मुशायराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात मध्यरात्रीपर्यंत हा मुशायरा चालला. शिवाजी महाराजांच्या सैन्यात सर्व जातीधर्माचे मावळे होते. शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्षतेवर शायरांनी शायरी सादर केली. शिवप्रेमींसह मुस्लिम समाजातील रसिकांनी मुशायऱ्याला भरभरून दाद दिली. मुशायराचे आयोजनानेही हिंदू-मुस्लिम एकोप्याचे दर्शन घडले. या मुशायरामध्ये जबलपूर येथील मन्नान फराज, रायपूर येथील अजीम नवाज, भुसावळ येथील हमीद, अकोलाचे नईम फराज, बऱ्हाणपूरचे अफजल दानिश, वाशीमचे फारुख जमन यांच्यासारख्या दिग्गज शायरांनी एकापेक्षा एक शायरीने अकोलेकरांना घायाळ केले. मुशायरा या कार्यक्रमाचे अध्यक्ष साजिद खान पठाण होते, तर प्रमुख अतिथी म्हणून भारिपचे गटनेते गजानन गवई, राष्ट्रवादीचे गटनेते राजकुमार मूलचंदानी यांची उपस्थिती होती. शिवजयंतीनिमित्त प्रथमच ऑल इंडिया मुशायराचे आयोजन अकोला शहरात करण्यात आले. यामुळे एकतेचे दर्शन घडले.