आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभयारण्यालगतची गावे लवकरच होणार विकसित , रोजगारही मिळणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - अभयारण्या लगतच्यागावांचा सर्वांगीण विकास करून वन्यप्राणी मानवातील संघर्ष कमी होऊन सहजीवन प्रस्थापित करून रोजगार संधी वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जन-जल-जंगल जमिनीचा शाश्वत विकास करण्याचा शासनाचा मानस असून, यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन विकास योजना सन २०२० पर्यंत राबवली जाणार आहे. या योजनेचा लाभ बुलडाणा जिल्ह्यातील वन परिक्षेत्रालाही होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील अभयारण्याच्या क्षेत्रात गावांच्या पूनर्वसनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. नागरिक जळाऊ लाकडे, घरगुती, जनावरांना चारा, रोजगार आदी गरजांसाठी वनांवर अवलंबून असतात. यामुळे वनक्षेत्राचा दर्जा खालावत आहे. वन वन्यजीवांचे संरक्षण वनव्यवस्थापनाचा दर्जा उंचावणे आवश्यक असल्याने जन विकास योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण नागरिकांचा सहभाग घेण्याच्या दृष्टीने ग्रामसभांसोबत करारनामा करण्यात येणार आहे. जन-जल-जंगल-जमिनीचा शाश्वत विकास साधून उत्पन्न, उत्पादकता पर्यायी रोजगार संधी वाढवून संरक्षित क्षेत्रावरील मानवी दबाव कमी करण्यात येणार आहे. तसेच गावनिहाय सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करून गावांचा परिस्थितीकीय विकास सर्व विभागाची सांगड घालून करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरावरील प्रकल्पस्तरीय समिती अशी
उपवनसंरक्षक,उपविभागीय अधिकारी महसूल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, भूजल सर्वेक्षण विभागाचे उपसंचालक, दोन अशासकीय प्रतिनिधी, दोन ग्राम विकास समितीच्या अध्यक्षांचा जिल्हास्तरावरील प्रकल्पस्तरीय समितीमध्ये समावेश राहणार आहे. या समितीचे अध्यक्ष मुख्य वनसंरक्षक, तर सदस्य सचिव उपसंचालक बफर, विभागीय वन अधिकारी, बफरसंबंधित उपवनसंरक्षक राहतील.

रोजगाराची संधी उपलब्ध
गावातीलमहिला युवकांना स्वंयरोजगाराविषयी प्रशिक्षण देऊन क्षमता बांधणी करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी औद्योगिक पर्यटन संस्थांचा सहभाग घेणे गौण वन उपज संकलन करण्यात येणार आहे. पशू जल, कृषी संसाधनांचा विकास करण्यात येणार आहे.

आराखडा तयार होणार शास्त्रोक्त पद्धतीने
प्रकल्पनिहायकृती आराखडा सूक्ष्म पद्धतीने तयार करण्यात येणार आहे. कृषी तज्ज्ञ, वानिकी तज्ज्ञ, समाजशास्त्र तज्ज्ञ, सिंचन तज्ज्ञ, निसर्ग तज्ज्ञ शास्त्रोक्त पद्धतीने आराखडा तयार करणार आहेत.

गावांची होणार निवड
अभयारण्यातीलत्याच्या सीमेपासून दोन किलोमीटर आत येणाऱ्या गावांचा या योजनेत समावेश होणार आहे. गावातील वन व्यवस्थापन समितीच्या कामाचा निरीक्षण करण्यात येणार आहे. गाव निवडताना गाव समूह तत्व अवलंबण्यात येणार आहे. गावातील लोकांची जवळपास २४ सदस्यांची समिती तयार करण्यात येणार आहे. मिळणाऱ्या निधी व्यवस्थापनेच्या उद्दिष्टांसाठी बँकेत किंवा पोस्टात खाते उघडण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र
जिल्ह्यातसातपुडा पर्वतरांगांमध्ये अंबाबरवा अभयारण्य वसलेले आहे. तर सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये ज्ञानगंगा अभयारण्य आहे. या अभयारण्याचे क्षेत्रफळ २२ हजार हेक्टर आहे, तर १४ हजार हेक्टर क्षेत्र प्रादेशिक वन विभागाचे आहे. लोणार येथेही अभयारण्य आहे.