आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६४ घाटांच्या लिलावातून शासनाला साडे सहा काेटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - जिल्ह्यातील १२९ पैकी ६४ वाळू घाटांचा लिलाव रविववारी अाॅन लाईन पद्धतीने करण्यात अाला. या लिलावातून शासनाला काेटी ६६ लाख ६६ हजार ८८४ रुपयांचा महसूल मिळणार अाहे. उर्वरित घाटांचे लिलाव दुसऱ्या टप्प्यात हाेणार अाहे.
जिल्ह्यातील १२९ वाळू घटनांचा लिलाव करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वी घेतला हाेता. सर्व घाटांचा लिलाव एकाच वेळी करण्याची तयारी प्रशासनातर्फे करण्यात अाली. यासाठी कंत्राटदारांच्या नाेंदणीची प्रक्रिया अाॅक्टाेबरला पार पाडण्यात अाली. ७१ घाटांच्या लिलावातून काेटी ९७ लाख ९८ हजार ५०० रुपये अािण ६० घाटांच्या लिलावातून काेटी २९ हजार ६३ हजार ६०० रुपये महसूल मिळणे अपेक्षित हाेते. दरम्यान, अाॅक्टाेबर राेजी अाॅन लाईन पद्धतीने लिलावाची प्रक्रिया पार पाडली. जिल्हा खनीकर्म अधिकारी डाॅ. रामेश्वर पुरी यांनी अाॅनलाईन लिलाव पद्धतीवर लक्ष ठेवले. दुपारी सुमारे २.३० वाजतापर्यंत ही प्रक्रिया पार पडली.
वेळवाढल्याने झाला ६५ लाखाचा फायदा : वाळूघाटांच्या लिलावासाठी निविदा मागवण्यात अाल्या हाेत्या. यातून अधिकाअधिक किंमत प्राप्त झाली हाेती. तीच रक्कम अाधारभूत मानण्यात अाली. त्यानंतर रविववारी सकाळी वाजता अाॅन लिलाव पद्धतीला प्रारंभ झाला. दुपारी वाजतापर्यंत वेळ निश्चित करण्यात अाली हाेती. बाेली लावताना ज्याची रक्कम सर्वात जास्त हाेती, त्याला संबंधित घाटाचा कंत्राट देण्यात अाला. या लिलाव प्रक्रियेत नंतर १० मिनिटांचा कालावधी तीन वेळा वाढण्यात अाला. वेळ वाढवण्यात अाल्याने ६५ लाख रुपये जादा महसूल मिळणार अाहे.

जीएसडीएनेिदली हाेती हिरवी झेंडी : वाळूनघाटांच्या लिलावासाठी भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने (जीएसडीए) ने हिरवी झेंडी दाखवल्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडण्यात अाली. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षेखालील पर्यावरण अाघातमूल्य निर्धारण प्राधिकरण अाणि जिल्हास्तरीय तज्ज्ञ मूल्यांकन समितीने घाटांच्या रचनेला संमिती दिली हाेती.
जिल्ह्यांतील सर्व नद्यांमधील २५६ वाळू घाटांपैकी १२९ घाटांच्या उत्खननाला वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्या पडताळणीनंतर मान्यता प्राप्त झाली हाेती. त्यापैकी ६४ घाटनांचे लिलाव रविवारी करण्यात अाली. उर्वरित घाटांचे लिलाव दुसऱ्या टप्प्यात हाेणार अाहे.
तालुकािनहाय घाटांचे लिलाव
६५ घाटांचे लिलाव हाेणार दुसऱ्या टप्यात : जिल्हयातील १२९ पैकी उर्वरित ६५ घाटांचे लिलाव दुसऱ्या टप्प्यात हाेणार अाहेत. यामध्ये अकाेला तालुक्यातील १६, तेल्हारा -०२, बाळापूर १९, पातूर-०३, बार्शीटाकाळी-१५ अाणि अाकाेट तालुक्यातील १० घाटांचा समावेश अाहे.
वाळू माफियांना राेखण्याचे अाव्हान : जिल्ह्यातसध्या ६५ वाळू घाटांचे लिलाव हाेणे बाकी अाहे. पातूर, बार्शिटाकळी, अकाेट तालुक्यातील एकाही घाटाचा लिलाव झाला नाही. अकाेला तेल्हारा तालुक्यातील काही घाटांचा लिलाव हाेणे बाकी अाहे. गतवर्षी तेल्हारा अकाेला तालुक्यात ्रेतीचे अवैध उत्खनन वाहतूक करणाऱ्या वाहनांवर माेठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात अाली हाेती. तेल्हारा तालुक्यात लगत असलेल्या बुलडाणा जिल्हा असून तेथून रेतीची अवैध वाहतूक अकाेला जिल्ह्यात हाेते. काही महिन्यांपूर्वी तत्कालीन तेल्हारा तहसीलदारांनी वाळू माफियांवर कारवाईसाठी माेिहमच राबवली हाेती. एक वेळा तर तहसीलदारांवर हल्लाही झाला हाेता.
याप्रकरणी नंतर तेल्हारा पाेिलस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात अाला हाेता. त्यामुळे अाता लिलाव झालेल्या घाटांमधून रेतीचे अवैध उत्खनन हाेणार नाही, यासाठी प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...