आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू माफियांकडून तलाठ्याला मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलकापूर - तालुक्यातील पान्हेरा शिवारातील नदीपात्रात अवैध वाळू उपसा करताना हटकल्यावरून वाळू माफियाने चक्क तलाठ्याची कॉलर पकडून मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पान्हेरा शिवारात नदीपात्रात सर्रास बेकायदा वाळू उपसा केला जात अाहे, अशी माहिती महसूल प्रशासनाला मिळाली हाेती. त्यानुसार तलाठी बाळू किसन जाधव यांनी घटनास्थळी जाऊन एपी २५ एच ०९३५ या क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा मालक बन्नू पहिलवान व काही मजूर यांना वाळू उपसा करताना पकडले. या प्रकाराने चिडून बन्नू पहिलवान याने तलाठी जाधव यांची कॉलर पकडली व पंचनाम्याचे कागदपत्रे फाडून फेकली. याप्रकरणी तलाठी जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी बन्नू पहिलवानविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.