आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेती माफिया सैराट, लाखो रुपयांच्या महसुलास चुना, पाच वाहने पकडली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंदखेडराजा- तालुक्यातून वाहणाऱ्या खडकपूर्णा नदीतून मोठ्या प्रमाणावर रेती उपसा सुरू आहे. लिलावात ठराविक ठिकाणी रेती घाट स्थापन केलेले असतानाही, इतर अनेक ठिकाणांवरून अवैधपणे रेती उपसा होत आहे. या सर्व प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे शासनाचा महसूल, तर बुडत असून काठावरील शेती खचण्याची शक्यताही आहे. या प्रकरणात तक्रार केली असता, त्यास केराची टोपली दाखवली जात असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तालुक्यातील डिग्रस ते लिंगा-देवखेड परिसरापर्यंत खडकपूर्णा नदी वाहते. या परिसरात विविध ठिकाणावरून रेती उपसा केला जातो. त्याचा महसूलही शासनाला मिळतो. मात्र, महसुली उत्पन्नावर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणेला छेद देत नदी मार्गावर असलेल्या काही गावांमधून ठरलेल्या रेती घाटाव्यतिरिक्त वेगळ्या ठिकाणावरूनही अवैध रेती उपसा केला जात असल्याचे चित्र आहे. नदीपात्रात काही ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत. अशा ठिकाणांवरून रेती उपसा केला जात आहे. रेती घाटावर ठेकेदार आणि महसूल यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित असतानाही सर्रास रेती उपसा केला जात आहे. यासाठी नदी काठावरील काही शेतकऱ्यांना आमिष दाखवत रेती वाहतुकीसाठी रस्तेसुद्धा वाळू माफियांनी तयार केले आहेत. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
तक्रारीनंतर दुपटीने वाढला उपसा : साखरखेर्डायेथील आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या जनता दरबारात यासंबंधी तक्रार केली असता, त्यावर काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. उलट दुप्पट वेगाने अवैध उपसा वाढला आहे. यामुळे अवैध रेती उपसा लाभाचा अर्थपूर्ण प्रसार वरपर्यंत झाला असल्याच्या शंकेला वाव मिळत आहे.
तक्रारींना केराची टोपली : यासर्व प्रकारांकडे संबंधित यंत्रणा अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे, तर नदीकाठाजवळ खोदकाम केल्यामुळे पावसाळ्यात नदीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे वरील भागात असणारी शेती खचून जाण्याची शक्यता आहे. याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केली असता, त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
शेतीला धोका निर्माण
^रेतीघाटनसताना नदीच्या काठाशेजारीच खोदकाम करत वाळू नेण्यात येत आहे. त्यामुळे नदीची दरड/थडी खचून आमच्या शेतामध्ये पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला आहे.'' एकनाथ नागरे, शेतकरी,हिवरखेड पूर्णा.
खडकपूर्णा नदीतून अशाप्रकारे रेतीची अवैधरित्या वाहतूक केली जाते.
तक्रार द्या कारवाई करू
^तालुक्यामध्येज्याठिकाणी अवैध रेती उपसा करण्यात येतो त्या ठिकाणांची शासंदर्भात तक्रार द्या. तक्रारीनंतर तातडीने त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई करू.'' गणेश माळी, नायबतहसीलदार, सिंदखेडराजा.

रेती वाहतूक करणारी पाच वाहने पकडली
अवैधरीत्यारेतीची वाहतूक करणारी पाच वाहने पकडून त्यांच्यावर ९२ हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई नायब तहसीलदार भागवत पाटील यांनी १९ जून रोजी केली.
शेगाव तालुक्यातील लोहारा, माटरगाव, भोनगाव, जलंब या नदी पात्रातील रेती अवैध चोरट्या मार्गाने वाहतूक केल्या जात असल्याची माहिती नायब तहसीलदार भागवत पाटील यांना मिळाली. या वेळी त्यांच्यासह महसूल पथकाच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील विविध भागात जाऊन सुरेश जगन्नाथ वावरे यांच्या एम.एच.३१/ ए.पी./ ४९९ वाहन ब्रास रेती किंमत १५ हजार ४०० रुपये, अभिमन्यू महादेव बाभुळकर झाडेगाव यांच्या एमएच २८/एच/ ७४५७ या क्रमांकाच्या वाहनात एक ब्रास रेती किंमत १५ हजार ४०० रुपये, अनिल नहारसिंग राजपूत जलंब यांच्या एमएच २८/ ए.बी./ ७९३५ या क्रमांकाच्या वाहनात दाेन ब्रास रेती किंमत ३० हजार ८०० रुपये, प्रवीण नामदेव पारस्कर माटरगाव यांच्या एम.एच.२८/ई/८७७५ या क्रमांकाच्या वाहनात एक ब्रास रेती किंमत १५ हजार ४०० रुपये असा एकूण ९२ हजार रुपये दंड आकारण्यात आला. तसेच रेतीची वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली आहेत. या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणारांचे धाबे दणाणले.
बातम्या आणखी आहेत...