आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील हजार गावांमधून १०० गावेच झाली "निर्मल'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यात शौचालयाच्या चळवळीला ब्रेक लागलेला दिसून येतो. गेल्या १५ वर्षांत तीन वेळा अभियानाच्या नावात बदल करण्यात आला. मात्र, तरीही जिल्ह्यातील १००९ गावांपैकी १०० गावेही शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे अजूनही ६० टक्के जनता उघड्यावरच शौचास बसत असून, स्वच्छ भारत मिशनला धक्का पोहोचत आहे.
७० टक्के जनता ग्रामीण भागात राहते. त्यामुळे देश सुजल निर्मल बनवायचा असेल, तर ग्रामीण भागातील जनतेचे राहणीमान सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला शुद्ध स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधांची उपलब्धता होणे महत्त्वाचे आहे. हा हेतू डाेळ्यासमोर ठेवून १९८६ मध्ये केंद्र पुरस्कृत ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर या कार्यक्रमात मागणी लोकसहभाग आधारित संपूर्ण स्वच्छता अभियानाची निर्मिती करण्यात आली. या अभियानांतर्गत कुटुंबामध्ये स्वच्छतेची मागणी निर्माण करण्यासाठी माहिती, शिक्षण संवाद उपक्रमांतर्गत लोकप्रबोधनाचे काम हाती घेण्यात आले. मात्र, वैयक्तिक शौचालय बांधून घेण्यासाठी नागरिकांकडून मिळत नसलेला प्रतिसाद योजनेला मोठा अडथळा बनला आहे. तालुका पातळीवर गटविकास अधिकारी ग्रामपातळीवर ग्रामसेवक हा अडथळा दूर करण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येते. जिल्हा पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीसुद्धा शौचालयाच्या मुद्द्याबाबत गंभीर नसल्याने जिल्ह्यातील ५४२ ग्रामपंचायतीअंतर्गत येणारी १०० गावेच हागणदारीमुक्त झाली आहेत.

अनुदानवाढले तरी प्रतिसाद नाही : विविधप्रवर्गांतील कुटुंबांकडे शौचालयाची सुविधा नसेल, तर अशा कुटुंबांना स्वच्छतेच्या सुविधा निर्माण करण्यासाठी जुलै २०१२ मध्ये ४६०० ते ५१०० रुपये अनुदान दिले जायचे. आता त्यात वाढ होऊन या वर्षीपासून प्रोत्साहनपर निधी १२ हजार रुपये करण्यात आला. मात्र, नागरिकांचा शौचालय बांधकामासाठी प्रतिसाद वाढलेला दिसून येत नाही.
यांनामिळू शकते प्रोत्साहनपर अनुदान : दारिद्र्यरेषेखालीलसर्व कुटुंबांना तसेच दारिद्र्यरेषेवरील कुटुंबातील एससी एसटी, लघुसीमांत शेतकरी, भूमिहीन मजूर, अपंग कुटंुब, महिलाप्रमुख असलेली कुटुंब यांनी शौचालयाचे बांधकाम करून त्याचा वापर केल्यानंतर प्रोत्साहन निधी तत्काळ देण्यात येतो.

जनता ग्रामीण भागात असल्याने त्या भागातील जनतेचे राहणीमान सुधारणे आवश्यक आहे.
जनता उघड्यावरच शौचास बसत असून, स्वच्छ भारत मिशनला धक्का पोहोचत आहे.

१०० टक्के हागणदारीमुक्तीसाठी पाणी स्वच्छता मिशनचे प्रयत्न
^नुकताच पाणी स्वच्छता मिशन (ग्रामीण) विभागाचा उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू झालो आहे. गटविकास अधिकारी यांच्याकडून अकोला जिल्ह्यात आतापर्यंतच्या कामकाजाचा अाढावा घेऊन शौचालय बांधकामाचा आराखडा तयार करणार आहे. लोकसहभाग कसा वाढेल, या दृष्टीने गावोगावी जनजागृतीवर भर देण्यात येणार आहे. आगामी काळात संपूर्ण जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेईल.'' समर्थशेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी स्वच्छता.

जिल्ह्यातील ८५ टक्के शाळा अंगणवाडीमध्ये शौचालये
^पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रामुख्याने शाळांमध्ये शौचालयांची व्यवस्था करण्यावर भर दिला आहे. जिल्ह्यातील शाळांमध्ये अंगणवाडीमध्ये शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संबंधित संस्थांच्या प्रमुखांनी तातडीने या कामासाठी पुढाकार घेऊन शौचालये बांधून घेतली. जिल्ह्यात हे काम ८५ टक्के झाले आहे. उर्वरित ठिकाणचा आढावा घेऊन १०० टक्के शौचालय उपलब्ध कसे होतील, या दृष्टीने प्रयत्न केले जातील.'' प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी.