बुलडाणा : महाविद्यालयीन युवा शक्तीला पाणी पुरवठा स्वच्छता या विषयामध्ये सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीने स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्या अनुशंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठीच्या स्पर्धेचे आयोजन काल १० जानेवारी रोजी येथील जिल्हा परिषदेच्या शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रथम, दितीय तृतीय या क्रमांकावर बाजी मारून मुलींनी आपले वर्चस्व सिध्द केले आहे. या स्पर्धेतम सेजल सारोळकर हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांची उपस्थिती होती. पाणी स्वच्छता या क्षेत्रात सर्व घटकांचा सहभाग लाभावा, या दृष्टीकाेणातून महाविद्यालयीन युवकांसाठी स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन तालुका, जिल्हा राज्य स्तरावर नियमित करण्यात येते. त्याअनुशंगाने जिल्हयातील सर्व तालुकास्तरीय स्पर्धा कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयीन गटात घेतल्या. या स्पर्धेतील प्रथम दितीय विजेत्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी प्रवेश देण्यात येतो.
कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी १० जानेवारीला जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेची सुरवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन दिप प्रज्वलन करून करण्यात आली. जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी २५ स्पर्धक सहभागी झाले होते. या मध्ये शुध्द पाणी ग्रामीण भागात स्वच्छतेचे महत्व, शौचालयाची आवश्यकता आदी विषयांवर युवकांनी विचार मांडत सभागृह मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेमध्ये सेजल सारोळकर, मे.सो.क.महाविद्यालय मेहकर या विद्यार्थीने प्रथम क्रमांक पटकावला.
दितीय क्रमांक चैताली मानकर, दि.न्यू.ईरा. महाविद्यालय, जळगाव जामोद हिने तर तृतीय पुरस्कार.भारती इंगळे, के.बी.जे.नाॅलेज हब कनिष्ठ महाविद्यालय, बोराखेडी प्रगती मिरगे, कला महाविद्यालय, शेगाव यांना विभागून दिला. स्पर्धेचे मुल्यांकनाची जबाबदारी प्रा.निशिकांत ढवळे, प्रा.मणाल सपकाळ, प्रा.डाॅ. शिवाजीराव देशमुख, जि.प.हायस्कूल साखळी बु. यांनी पार पाडली. स्पर्धेसाठी जिल्हा पाणी स्वच्छता मिशन कक्षातील सल्लागारांनी परिश्रम घेतले.
स्पर्धकांना सन्मानचिन्हा सह प्रमाणपत्रांचे वाटप
या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकासाठी हजार रुपये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकासाठी हजार सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धेकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र गौरविण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेचे विचार रुजवावे
स्वच्छतामित्र म्हणून सर्व युवकांनी ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेचे विचार रुजवून जिल्हा हागणदारी मुक्त होण्यासाठी स्वच्छता दूत म्हणून कार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांनी केले.