आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखोर हेडकॉन्स्टेबल संजय लांडे गजाआड, विनयभंगाचा गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- एकाविनयभंगाच्या प्रकरणात १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या बार्शिटाकळी पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल संजय लांडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मेडिकल कॉलेजमधून ताब्यात घेतले. याप्रकरणी ठाणेदार प्रकाश निंघोटही संशयाच्या घेऱ्यात असून, एसीबी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत.
बार्शिटाकळी येथील एका शिक्षण संस्थाचालकाच्या विरोधात विनयभंगाची तक्रार देण्यासाठी एक महिला प्राध्यापक १९ ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात गेली होती. मात्र, विवाहितेने पुराव्यानिशी म्हणजेच ऑडिओ टेप दिल्यानंतरही पोलिसांनी तक्रार घेऊन गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर महिला प्राध्यापक आणि त्यांचा पती हे वारंवार पोलिस ठाण्यात गेले. मात्र, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन हेड कॉन्स्टेबल संजय लांडे याने गुन्हा दाखल करण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. १० हजार रुपये पीआय साहेबांना द्यावे लागतात आणि तपास माझ्याकडेच राहणार असल्यामुळे पाच हजार रुपये मला लागतील, अशी मागणी त्याने तक्रारदारास केली. तक्रारदाराने त्यापैकी पाच हजार रुपये संजय लांडे यास दिले होते. त्यानंतर मात्र तक्रार दाखल करण्यासाठी दबाव वाढत गेल्यामुळे सप्टेंबर रोजी पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपपत्र पाठवणे माझ्यास हातात आहे, असा धाक दाखवत संजय लांडे याने पुन्हा १० हजार रुपयांचा तगादा तक्रारदारास लावला. या प्रकरणाचे सर्व रेकॉडिंग तक्रारदाराकडे असल्यामुळे त्यांनी २० सप्टेंबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यावरून एसीबीने सापळा रचून संजय लांडे याला मेडिकल कॉलेजमधून अटक केली. लांडे याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मूकसंमतीवरप्रश्नचिन्ह : तक्रारकर्त्यानेठाणेदारांना सांगितले होते की, तुमचा पोलिस मला १५ हजार रुपये मागतो. यावर ठाणेदार म्हणतात की, माझ्या नावाने कुणीही पैसे मागतो. असे म्हणून पैशाच्या मुद्द्यावर संभाषण करणे टाळले आहे. या पुराव्याची क्लिप एसीबीच्या हाती लागली आहे. असे असताना ठाणेदाराने संबंधित पोलिस कॉन्स्टेबलला जाब का विचारला नाही. त्यामुळे तेसुद्धा संशयाच्या घेऱ्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एसीबी त्यांची कसून चौकशी करत आहे. त्यांच्या विरोधात प्रबळ पुरावे नसल्यामुळे त्यांच्यावर आजतरी काहीही कारवाई केली नसल्याची माहिती आहे.

ठाणेदाराने उधळली अशीही मुक्ताफळे
गुन्हादाखल करण्यासाठी दबाव वाढत असल्याचे लक्षात येताच ठाणेदारांनी पत्रकार आणि वकिलांवर मुक्ताफळे उधळली. मी मुंबईचा अधिकारी आहे. वकील तुम्हाला मूर्ख बनवतात. पत्रकार मूर्ख बनवतात. त्यांना माझ्यापेक्षा जास्त जमते काय, ते तुमच्यासारख्यांना चुकीचे मार्गदर्शन करतात. पत्रकारांना केवळ १० हजार रुपये पगार असतो. मला ५५ हजार रुपये आहे. मला अधिकार आहेत. त्यांना काय अधिकार आहेत काय? मी शासकीय नोकर आहे. माझ्यापेक्षा त्यांना कायदा समजतो काय? मी त्यांना उभेही करत नाही, तुम्ही त्यांच्याच नादी लागले, अशी मुक्ताफळे ठाणेदारांनी उधळल्याचे समोर आले आहे.