शेगाव- शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांची पालखी शनिवारी सकाळी 7 वा. विठूरायाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. पालखीचे हे 49 वे वर्ष असून 700 वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. दरवर्षी आषाढी एकादशीसाठी राज्यातून हजारो दिंड्या विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. या पालख्यांमध्ये शेगावीच्या पालखीकडे सर्वांचे डोळे लागलेले असतात.
- सकाळी 6 वाजेपासून शेगावच्या मंदीरात हजारो भाविकांची गर्दी होती.
- श्रींच्या रजत मुखवट्याचे व्यवस्थापकीय विश्वस्थ शिवशंकरभाऊ पाटील यांनी पुजन केले.
- पालखीसोबत 700 वारकर्यांसह 2 रूग्णवाहीका, पाण्याचे टँकर, 2 ट्रक आहेत.
- 13 जूलै रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचणार आहे.
- पंढरपूरात पालखीचा 8 दिवसांचा मुक्काम राहणार आहे.
- त्यानंतर 19 जूलै रोजी पालखी शेगांवकडे पंढरपूरवरून मार्गस्थ होईल.
- शेगांव शहरात पालखीचे पुनरागमन 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करुन पाहा, गजानन महाराजांच्या पालखीचे फोटो..