आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांंतता समितीच्या बैठकीत गाजला प्रशासनाच्या बेबंदशाहीचा मुद्दा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गणेश मूर्तीच्या उंची कमी ठेवण्यासाठी पाेलिस प्रशासन मंडळांना धमकावत असून, अत्यंत कठाेर शब्दात नाेटीस बजावण्यात येत असल्याचा अाराेप सार्वजिनक गणेशाेत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी शांतता समितीच्या बैठकीत केला. रस्त्यांची दुरावस्था, बंद असलेले पथदिवे लाेंबकळत असलेल्या विद्युत तारांचा मुद्दाही बैठकीत पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या अाराेपांचे अधिकाऱ्यांनी खंडण करीत उत्सवादरम्यानच्या सर्व समस्या साेडण्यात येतील असे अाश्वासन लाेकप्रतिनिधी अधिकाऱ्यांनी दिले. गणेशाेत्सवासह इतरही धार्मिक उत्सव शांततेत उत्साहात पार पाडण्याचा निर्धारही बैठकीत सर्वांनी केला.
साेमवारपासून गणेशाेत्सवाला प्रारंभ हाेणार अाहे. यासाठी मंडळांनी जाेरदार तयारी सुरु केली अाहे. या पृष्ठभूमीवर सप्टेंबर राेजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा शांतता समितीची सभा अायाेजित करण्यात अाली. सभेत व्यासपीठावर प्रामुख्याने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पाेलिस अधीक्षक चंद्रकिशाेर मिना, अतिरिक्त पाेलिस अधीक्षक विजयकांत सागर, सार्वजिनक गणेशाेत्सव मंडळाचे पदाधिकारी अॅड. माेतीिसंह माेहता, महापाैर उज्वला देशमुख, माजी महापाैर मदन भरगड, माजी राज्यमंत्री अजहर हुसेन, मनापा उपायुक्त समाधान साेळंके, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे उपस्थित हाेते.
प्रास्तविक अतिरिक्त पाेलिस अधीक्षक सागर यांनी केले. कायदा हा सर्वांसाठी समान असून, सर्वांनी नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करावा. साेशल मिडीयावरुन फिरणारा अाक्षेपार्य मजकूर, छायाचित्रे, व्हिडीअाे पसरवू नये, असे अावाहन सागर यांनी केले. बैठकीत अनेक सदस्यांनी मनाेगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पाेलिस निरीक्षक संजय खांडेकर यांनी केले.

रस्त्यावरुन महापैरांनी घेतला अभियंत्यांचा ‘वर्ग’ : कावडपालखी उत्सवात टिळक राेड, लाेखंडी पुलावरील खड्डे बुजवण्यात अाले. मात्र खड्यांमधील गिट्टीमुळे शिवभक्तांच्या पायाला जखमा झाल्याचे सांगत मनपाने लक्ष देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यावर महापाैर उज्वला देशमुख यांनी रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्याचे सांगत संबंधित अभियंत्यांना जाब विचाराला. या मार्गावर २७५ खड्डे अाहेत, असेही त्यांनी सांगितले. यावर अभियंत्यांनी पाऊस खूप झाल्याचे सांगितले. मात्र उर्वरित.पान
‘तुमचा सत्कार केला पािहजे’, असा टाेला अनेक पदाधिकाऱ्यांनी लगावला. यावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी चाैकशी करुन अहवाल सादर करण्याचे अादेश दिले. संबंधित कंत्राटदारला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

सत्तेचा उपयाेग काय ?
जुने शहरातील एका अाखाड्याच्या पदािधकाऱ्याने मनपासह राज्यात भाजपची सत्ता असूनही उपयाेग नसल्याचा टाेला लागवला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडून विकासाठी काेट्यवधी रुपयांचा निधी अाला असून, पुढच्या वर्षात विकास दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला. शांतता समितीच्या सभेत भाजपचे अामदार उपस्थित नव्हते.

२) सिद्धार्थ शर्मा:- यंदा गणेशाेत्सवाचे १२३वे वर्ष अाहे. उत्सवासाठी अाॅन लाईन परवानगी अर्ज भरण्यासाठी प्रचंड अडचणी येत अाहेत. १२ फूट पेक्षा जास्त उंच मूर्ती नकाे, यासाठी पाेलिस मंडळांना धमकावत असल्याचा अाराेप सार्वजिनक गणेशेत्सव मंडळाचे पदाधिकारी सिद्धार्थ शर्मा यांनी केला. मात्र मूर्ती तयार करण्याचे काम तीन महिन्यांपूर्वीच सुरु झाले असून, अाता उंच कमी करणे शक्य नाही. तसेच मंडपावरुन पाेलिस प्रशासन मंडळाचे सािहत्य जप्त करण्याचे इशारे देत अाहे. प्रशासनाची बळजबरी खपवून घेतली जाणार नाहीे, असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.
मान्यवरांनी मांडल्या समस्या, सांगितल्या उपाययाेजना
एक खिडकी याेजना हवी : उत्सवासाठीिवविध विभागांकडून परवानी घेण्यासाठी गणेशभक्तांची पायपीट हाेत अाहे. त्यामुळे सर्वच परवानगी एकाच ठिकाणी मिळण्यासाठी एक खिडकी याेजना राबवावी, असे मत मदन भरडगड यांनी व्यक्त केले.

फांद्याताेडा : पाेिलसांनीप्रत्येक मंडळात एक पाेलिस मित्रांची नेमणूक करण्याची मागणी विमल जैन यांनी केली. विसर्जन मार्गावरील अडथळा ठरत असलेल्या झाडांच्या फाट्या ताेडण्यात याव्यात, असे मत पांडे यांनी व्यक्त केले. जप्त केलेल्या डिजेची वाहने परत देण्याची मागणी सिमा ठाकरे यांनी केली. बैठकीत माजी राज्यमंत्री अहजर हुसेन, विठ्ठल गाढे, अभिषेक भरगड अादींनीही मनाेगत व्यक्त केले.

गणेशाेत्सव व्हावा इकाेफ्रेंडली : गणेशेत्सवइफाे फ्रेंडली साजरा करावा. यासाठी शाडू मातीच्या मूर्तीची स्थापना करण्याची सूचना एका गणेश भक्ताने केली. माेठ्या गणेश मंडळांनी घरगुती मूर्ती विसर्जनासाठी स्वीकाराव्यात, असे अावाहन महापैार उज्वला देशमुख यांनी केले. रस्त्यांसह इतरही समस्या साेडण्यात येतील, असे अाश्वासनही त्यांनी दिले.

विद्युत तारा : गणेशाेत्सविवसर्जन मार्गावरील समस्या सुटण्यासाठी दरवर्षी शांतात समितीच्या बैठकीमध्ये चर्चा हाेते. मात्र नंतर समस्या जैसे थेच राहत असल्याचे प्रा. माेहन खडसे यांनी सांगितले. त्यामुळे लाेंबळकत असलेल्या विद्युत तार, रस्ते दुरुस्त करण्याची मागणी त्यांनी केली. यावर महावितरणचे कार्यकारी अभियंता डि.एम.मानकर यांनी तारांची पाहणी केली असून, ही समस्या साेडवण्यात येईल, असे अाश्वासन दिले.

सीसीकॅमेरे : उत्सवकाळात विसर्जन मार्गावर सीसीकॅमेऱ्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २१ लाख रुपये मंजूर केले अाहेत. विद्युत पुरवठा अखंडीत राहावा, यासाठी जनरेटरची व्यवस्था करण्यात येणार अाहे, असे पाेलिस अधीक्षक चंद्रकिशाेर मिना यांनी सांगितले.

रुग्णवाहिका: विसर्जनमार्गवरील चाैकात अत्याधुनिक रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात येणार अाहे. दुर्घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले.

कारवाईत पक्षपात हाेणार नाही : एसपी
नाेटीस बजावण्याचे अधिकारी पाेलिसांना असून काेणात्याही कारवाईत पक्षपात करण्यात येत नाही, असे पाेलिस अधीक्षक चंद्रकिशाेर मिना यांनी बैठकीत स्पष्ट केले. मूर्तीच्या उंचावर पाेिलसांचा अाक्षेप नाही, मात्र मूर्तीची विटंबना हाेता कामा नये. गणेशभक्त विद्युत तारा बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. अशी वेळी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारत येत नाही. मंडपासह इतरहीबाबत न्यायालय किंवा शासन जनहितासाठी निर्णय घेते. मंडळांसाठी सीसी कॅमेरे बंंधनकारक नाहीत, मात्र गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी माेठ्या मंडळांनी सीसी कॅमेरे लावावित. दाेन्ही पुलांना कठडे लावणे अावश्यक अाहे. मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मिरवणूक वेळेत संपण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे अावाहनही मिना यांनी केले.

गणेश उत्सव साजरा करणे गुन्हा अाहे काय : अॅड. माेहता
पाेलिसांनी कायद्याची अंमलबजावणी करावी. मात्र मंडळाचे पदाधिकारी सदस्यांना बाजवण्यात अालेल्या नाेटीसमधील भाषा व्यवस्थित हवी, असे सांगत गणेश उत्सव साजरा करणे गुन्हा अाहे काय, असा सवाल अॅड. माेतीसिंह माेहता यांनी उपस्थित केला. असंताेष निर्माण करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा अाराेप त्यांनी केला. नाेटीसमधील भाषेवर अाक्षेप घेत पाेिलसांनी मार्गदर्शक तत्वे जारी केले असते तर याेग्य झाले असते. पाेलिस प्रशासन सीसी काॅमरेसह सर्वच बाबी मंडळांना करण्यास सांगत अाहे. सर्व बाबींची पूर्तता मंडळांनी करायची तर, प्रशासन काय करणार असा सवाल, अॅड. माेहता यांनी उपस्थित केला. यावेळी बैठकीला उपस्थित मान्यवरांनी प्रशासनाला काही सूचनाही केल्या.

तक्रार राहणार नाही : जिल्हाधिकारी जी. श्रीकांत
पूर्वीपेक्षा अकाेला बदलत असून, टिळक राेडसह मिरवणूक मार्गाचे काम लवकरच सुरू हाेणार अाहे. यासाठी १० काेटींचा निधीही मंजूर झाला अाहे. त्यामुळे पुढील वर्षापासून रस्त्याची समस्याच राहणार नाही, असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. धार्मिक उत्सवांच्या काळात पाेलिसांवर प्रचंड ताण असताे. लवकरच बांधकाम विभाग, महािवतरण, पाेलिसांसह संबंधित विभाग विसर्जन मार्गाची पाहणी करणार अाहे. बैठकीला गैरजहर अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात येईल. गणेशाेत्सवसाठी मनापेही अर्थसंकल्पात तरतूद करावी. महापाैरांना जबाबदारी झटकता येणार नाही. तडीपार केलेले अाराेपी दिसता कामा नये, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...