आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ ग्राम स्पर्धेमध्ये अकोल्‍यात सराव गाव प्रथम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा निकाल शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईअाे) अरूण विधळे यांनी केला. प्रथम क्रमांक बार्शिटाकळी तालुक्यातील ग्राम पंचायत सरावने पटकावला. जिल्हा १०० टक्के हागणदारीमुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे अावाहन सीईअाेंनी केले. जिल्ह्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अायाेजित करण्यात अाली हाेती.
 
स्पर्धेत बाजी मारण्यासाठी ग्रामपंचायतने तयारी केली हाेती. यासाठी ग्रामस्थांचे समुपदेशनही करण्यात अाले हाेते. अनेक ठिकाणी स्वच्छता माेहिमाही राबवण्यात अाल्या हाेत्या. दरम्यान, या स्पर्धेचा निकाल शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात जाहीर करण्यात अाला. स्पर्धेत द्वितीय क्रमांक बार्शीटाकाळी तालुक्यातील ग्राम पंचायत पाराभवानी अाणि तृतीय क्रमांकाचे पारिताेषिक बाळापूर तालुक्यातील ग्राम पंचायत मांडोलीने पटकावले. स्पर्धेत विशेष पुरस्कारप्राप्त करणाऱ्या ग्रामपंचायतींची नावेही जाहीर करण्यात अाली.

यामध्ये स्व.वसंतराव नाईक विशेष पुरस्कारासाठी ग्राम पंचायत बेलुरा (तालुका पातूर) ,स्व.आबासाहेब खेडकर विशेष पुरस्कारासाठी ग्राम पंचायत बाभुळगाव (तालुका तेल्हारा) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष पुरस्कारासाठी बक्षिसपात्र ग्राम पंचायत केळीवेळी (तालुका अकोट) यांना पुरस्कार जाहिर. वेळी कार्यक्रमाला पाणी स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, मुख्य वित्त लेखाधिकारी गिता नागर, गट विकास अधिकारी तापी, गट विकास अधिकारी गजानन वेले यांच्यासह राजेंद्र डहाके अादी उपस्थित हाेते. याप्रसंगी वेळी पुरस्कार जाहिर झालेल्या ग्राम पंचायतीचे सरपंच ग्राम सेवक यांचा सीईअाेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्त ग्राम पंचायतीचे सरपंच, ग्राम सेवक पदाधिकारी यांनी त्यांच्या पंचक्राेतील १०० टक्के हागणदारी मुक्त करावेतअ अाणि त्यांनी स्वच्छतादुत म्हणुन कार्य करावे, असे आवाह सीईअाेंनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ शेवाळे यांनी केले. सुत्रसंचालन शाहू भगत यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...