आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपुडा फाउंडेशन, निसर्गकट्टाच्या माध्यमातून चळवळ सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अलीकडेकागदांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कागदाच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल होते. ते थांबवण्यासाठी अनेक बड्या कंपन्या पेपरलेस वर्कवर भर देतात. यात अकोल्यातील विद्यार्थीही आघाडीवर आहेत. जुन्या वहीतील कोऱ्या कागदांचा पुनर्वापर करून वृक्षमित्र वहीच्या माध्यमातून ते जंगल वाचवण्याचा संदेश देत आहेत.

साधारणपणे २००७-०८ मध्ये सातपुडा फाउंडेशन, निसर्गकट्टाच्या माध्यमातून या चळवळीला प्रारंभ झाला. परीक्षा आटोपल्यानंतर उन्हाळी सुट्ट्या लागण्यापूर्वी किंवा निकालाच्या दिवशी शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांना आपल्या वहीतील कोरी पाने आम्हाला द्या, अशी साद घालण्यात आली. बऱ्याच शाळांमधून मोठ्या प्रमाणावर कोरे कागद संकलित झाले. मग त्यांना नीट करून त्याला बाईंडिंग करुन नवीन वह्या तयार करण्यात आल्या. ज्या शाळांमधून कोरे कागद गोळा झाले होते, त्याच शाळांना या नवीन वह्या भेट देण्यात आल्या. त्यामुळे नवीन वह्या पाहून विद्यार्थी सुखावले. हळूहळू या चळवळीला गती मिळाली. दरवर्षी जागतिक वसुंधरा दिनाला हा उपक्रम राबविण्यात येत होता, यंदा मात्र जागतिक व्याघ्र दिनी २९ जुलैला हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात शहरातील स्वावलंबी विद्यालय, डीएव्ही कॉन्व्हेंट, आदर्श इंग्लिश स्कूल, मोहरीदेवी खंडेलवाल शाळा, इंग्लिश स्कूल, खंडेलवाल इंग्लिश, महाराष्ट्र माध्यमिक, राजेश्वर कॉन्व्हेंट
आदीशाळांमधील विद्यार्थी उत्साहाने सहभागी होतात. यंदा एकट्या राजेश्वर कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी १०० वह्यांची निर्मिती जून्या वहीतील कोऱ्या पानांपासुन केली आहे. यामध्ये कागदाचा पुर्नवापर होत असून वृक्षतोडीला आळा बसतो आहे. निसर्गकट्टामार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून हजारांवर वह्यांची निर्मिती झाली आहे. या उपक्रमासाठी निसर्गकट्टाचे अमोल सावंत, हरिष शर्मा, गौरव झटाले, प्रेम अवचार, विजय पवार, सौरभ मारोठे, तेजस्विनी रापर्तीवार आदी पुढाकार घेतात.

पालकांचाहीपुढाकार : याउपक्रमात निकालासोबत विद्यार्थ्यांना पालकांसाठी एक पत्र देण्यात आले. त्यामध्ये पुर्वी मोठ्या भावाची पुस्तके, उर्वरित वह्यांचा वापर घरातील लहान भाऊ करीत होता, मात्र आता सर्व दरवर्षी नवीन कोरे विकत घेण्याचा पायंडा पडला आहे. असे करता जुन्या वहीतील कोऱ्या कागदांचा, पुस्तकांचा पुर्नवापर करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्याला अनेक पालकांनी प्रतिसाद दिला. आज अनेक पालक आपल्या मुलांसाठी अशा वह्यांची निर्मिती करतात. शहरातील होलीक्रॉससमोरील ठाकुर बाईंडर यांच्याकडे दरवर्षी अशा प्रकारच्या वह्या, रजिस्टर निर्मितीसाठी येत असून त्यांची संख्या वाढती आहे.