आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब जिरवणे अावश्यक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील विविध जलस्रोतांमार्फत लाखो लीटर पाण्याचा अपव्यय होत आहे. नदी, नाल्यांसह कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाणीसुद्धा वाहून जात आहे. हे पाणी अडवल्यास पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली लागू शकतेच, शिवाय शेतीलाही पाणी मिळू शकते. यासाठी गावातील वाहून जाणारे पाणी थांबवणे गरजेचे असून, लोकसहभागातून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ मोहीम हाती घेणे आवश्यक आहे.
गेल्या तीन वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बळीराजा हतबल झालाच आहे, शिवाय जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेवरही परिणाम झालेला िदसून येतो. शासनामार्फत जलयुक्त शिवार अभियान राबवले जात आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब जिरवण्याचे आवाहन शासनाने केले आहे. तरीसुद्धा जिल्ह्यातील अनेक नदी, नाल्यांसह कोल्हापुरी बंधाऱ्याचे पाणी वाहत जात अाहे. पावसाळ्यात प्रशासन किंवा गावातील पाणीपुरवठा समिती पाणी अडवण्यासाठी कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. उन्हाळ्यात मात्र याच गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी ओरड होताना दिसते. शासनाने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा फायदा घेऊन ही चळवळ होणे गरजेचे आहे. केवळ यंत्रणेवर विसंंबून राहता लोकसहभागातून वाहणारे पाणी अडवण्यासाठी चळवळ उभी राहायला हवी. यात जनतेचा प्रत्यक्ष सहभाग आवश्यक आहे. जनतेच्या सहभागानेच हे अभियान यशस्वी होऊ शकते.लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा
सरपंच,पोलिस पाटील, पंचायत जि.प. सदस्यांंनी यथोचित भूमिका पार पाडल्यास अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधल्यास अभियानाचे यश पुढील खरिपातच दिसून येईल. जिल्ह्यात वरूर जऊळका, मुंडगाव या गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या सहकार्याने अभूतपूर्व कामगिरी केली आहे.'' -एम.देवेंदर सिंह, सीईओ.
नागरिकांनी सहभाग वाढवावा
अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पाणीटंचाई निर्माण झाली अाहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून पिण्याचे पाणी पिकास संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब जमिनीत जिरवूया.'' -जी.श्रीकांत,जिल्हाधिकारी
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून जाणून घ्‍या, कसे थांबवता येईल पाणी..