आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहात भेट मिळालेली रक्कम दिली ‘बेटी बचाओ बेटी पढाआे’अभियानाला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवदाम्पत्याकडून धनादेश स्वीकारताना जिल्हाधिकारी द्विवेदी. - Divya Marathi
नवदाम्पत्याकडून धनादेश स्वीकारताना जिल्हाधिकारी द्विवेदी.
वाशीम: लग्नातभेट म्हणून मिळालेली रोख रक्कम ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला देऊन अश्विनी शाम घोडेस्वार या नवदाम्पत्याने स्तुत्य पाऊल उचलले आहे. सोमवारी वाशीम-मंगरूळपीरचे आमदार लखन मलिक यांच्या उपस्थितीमध्ये अश्विनी शाम घोडेस्वार यांनी पाच हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सुपूर्द केला. 
 
या वेळी मुलीचे आई-वडील रुख्मिणी सीताराम जमनूक यांच्यासह मंगरूळपीर नगरपरिषदेचे शिक्षण समिती सभापती अनिल गावंडे, योगेश देशपांडे, पत्रकार बाळासाहेब काळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नितेश मलिक, बंडू पाटील महाले, धनंजय हेंद्रे, सुनील तापडिया, प्रल्हाद गोरे, मदन पाटील, धनाजी सरसकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य विनोद मगर, गणेश ढेकणे आदी यावेळी उपस्थित होते. 
 
अश्विनी ही मंगरूळपीर येथील अशोकनगरमध्ये राहणारे रुख्मिणी सीताराम जमनूक यांची कन्या. तिचा विवाह कारंजा लाड येथील उषा रामेश्वर घोडेस्वार यांचे पुत्र शामसोबत दि. १४ मे २०१७ रोजी मंगरूळपीर येथील लाल बहाद्दूर शास्त्री नगर भवनात झाला. या वधू-वरांनी लग्नात भेट मिळणारी रोख रक्कम ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’ला मदत म्हणून देण्याचा निश्चय केला. त्यानुसार या नवदाम्पत्याने भेट रूपाने मिळालेल्या पाच हजार रुपयांचा धनादेश आज आमदार लखन मलिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला.यावेळी आमदार लखन मलिक यांनी या नवदाम्पत्याचे कौतुक केले आहे. 
 
स्त्रीभ्रूणहत्या थांबवा : यावेळी बोलताना अश्विनी शाम घोडेस्वार या नवदाम्पत्याने सांगितले की, आईच्या गर्भातच मुलीची होणारी हत्या थांबली पाहिजे. याकरिता स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान’ला मदत करण्याचे आम्ही ठरविले. हा क्षण स्मरणात रहावा, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला.
 
 
बातम्या आणखी आहेत...