आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यामध्ये ज्वारीच्या पेरणीचा टक्का वाढला, ७५ टक्के झाल्या पेरण्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गतदोन वर्षांपासून जिल्ह्यातील शेती क्षेत्रातील ज्वारी पिकाचा पेरा घटला होता. खरिपात शेतकऱ्यांनी नाइलाजास्तव ज्वारी सोडून दुसऱ्या पिकाचा पर्याय निवडला होता. वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, कमी पर्जन्यमान विविध कारणांमुळे घटते उत्पादन येत असल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी पिकाचा पेरा घटवला होता. परंतु, या वर्षी खरिपाच्या पेरण्या सुरू असतानाच दोन वर्षांच्या तुलनेत ज्वारीचे क्षेत्र वाढल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीचा टक्का वाढला आहे.
खरीप हंगामातील पेरण्या वेळेवर पाऊस आल्यामुळे झपाट्याने झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी आतापर्यंत विविध पिकांची पेरणी शेतात केली आहे. सोयाबीनपाठोपाठ कपाशी तूर, मूग, उडीद ज्वारीच्या पेरण्या शेतकऱ्यांनी आटोपल्या आहेत. जिल्ह्यात सुमारे ७५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. अद्याप पेरणीखालील क्षेत्र अनेक गावालगत कोरडे आहे. गतवर्षी पावसाच्या अडथळ्यांमुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या जून जुलैमध्ये खोळंबल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पेरणीचे नियोजन बदलले होते. ज्वारीचा पेरा गत तीन वर्षांपासून कमी होत आहे. त्यामुळे जिह्यातील ज्वारीचे उत्पादनसुद्धा कमी झाले असून, जनावरांना चाराटंचाईच्या काळात कडबा कुटाराची कमतरता पडत आहे. चाराटंचाईमुळे या वर्षी गुराढोरांची भटकंती झाली होती. या वर्षी जून महिन्याच्या मध्यंतरी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्यास प्रारंभ केला होता. जिल्ह्यात जुलैपर्यंत ७१ टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्यानंतर पेरणीखालील क्षेत्रात वाढ होत आहे. ज्वारीचे क्षेत्र या वर्षी वाढलेले असताना त्याला अधिक प्रोत्साहन मिळावे म्हणून शासनाने ज्वारीला प्रती क्विंटलचा भाव वाढवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात असून, ज्वारीचे कोवळे पीक आता वन्यप्राण्यांच्या घशात जाऊ नये, याकरिता शेतकऱ्यांना चक्क रखवालदारी करावी लागत आहे. आतापर्यंतच्या विविध पिकांची स्थिती सध्या चांगली असून, शेतकरी आशादायी असल्याचे चित्र आहे.

प्रक्रिया करणारे उद्योग निर्माण व्हावे : जिल्ह्यातीलशेतकऱ्यांना शेती व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडण्यासाठी शेती मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची संख्या वाढवणे आवश्यक आहे. ज्वारी पिकावरही प्रक्रिया करणारे उद्योग उभारल्या गेल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे चाराटंचाईच्या समस्येतून पशुपालकांना दिलासा मिळेल. शासनाने अधिक प्रयत्न करावे, अशी अपेक्षा होत आहेत.
^ज्वारी पिकाचाया वर्षी खरिपात तीन एकर शेतीत पेरा केला. या पिकाला इतर पिकांपेक्षा कमी खर्च येतो. उत्पादन, चाऱ्याची समस्या काही प्रमाणात सुटते म्हणूनच खारपाणपट्ट्यातील कोरडवाहू क्षेत्रामध्ये ज्वारी पेरली आहे. ’’ नरसिंगदोड, शेतकरी, जऊळखेड

^कोरडवाहू क्षेत्रातील शेतात या वर्षी मी ज्वारी पेरली. ज्वारीचे पीक शेती मशागतीसाठी वेळ पैशांची बचत करणारे आहे. या वर्षी पाऊसमान चांगले राहिल्यास ज्वारीचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. '' प्रा.विठ्ठल कुलट, शेतकरी, अकोट
बातम्या आणखी आहेत...