आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: 1 काेटी रुपयांवर डल्ला मारण्याचा घाट; महाबीज, कृभकाेसह राबिनीवरही ठपका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- सरकार शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी काेट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी भ्रष्ट यंत्रणांमुळे याेजनांचा लाभ खऱ्या लाभार्थींपर्यंत पाेहाेचत नसल्याचे वास्तव हरभरा बियाणे घाेटाळ्याच्या निमित्ताने उजेडात अाले अाहे. बियाणे वितरणात शासनाची ९९ लाख ४९ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात अाला, असा ठपका चाैकशी समितीने अहवालात ठेवला अाहे. 

शासन अंगीभूत असलेल्या कृभकाे (कृषक भारती काे-अाॅप.), राबिनी (राष्ट्रीय बिज निगम) महाबिज या बियाणे पुरवठादार संस्थांनी निष्काळाजीपणाचा केला अाहे, अशा शब्दात या संस्थांवर चाैकशी अहवालात ताशेरे अाेढण्यात अाले. या संस्थांनी ३०.३८ टक्के रकमेची जादा देयके सादर केल्याचा धक्कादायक प्रकार चाैकशीच्या माध्यमातून समाेर अाला अाहे. कृषि वितरक, शासन यंत्रणांच्या भ्रष्टसाखळीत शेतकऱ्यांना अाेढून त्यांच्यावर काय कार्यकाही करावी, याबाबत मार्गदर्शन करावे, असेही चाैकशी अहवालात नमूद करण्यात अाले अाहे. हा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषि अधिकाऱ्यांनी कृषि अायुक्तांना सादर केला अाहे. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत रबी हंगामासाठी अनुदानावरील बियाण्याचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात अाला. यासाठी गत वर्षी एसएअाे कार्यालयाने बियाणे पुरवठादार असलेल्या महाबीज, कृभकाे, राबिनी या संस्थांना बियाणे पुरवठा करण्याचा अादेश दिला. मात्र बियाण्यांपासून सामान्य शेतकरीच बियाण्यांपासून वंचित राहिल्याचा अाराेप झाला हाेता. त्यानंतर उच्चस्तरीय चाैकशी पथक नेमण्यात अाले. दरम्यान, या चाैकशीत अनेक धक्कादायक प्रकार उजेडात अाले अाहेत. कुंपणानेच पीक फस्त करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक बाब पुढे अाली असून, कृभकाे, राबिनी महाबीजचे काही अधिकारी काही कृषि व्यावसायिकाच्या अभद्र युतीने शासनाच्या हेतूला हरताळ फासला अाहे. या घोटाळ्याचा संपूर्ण अहवाल जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र निकम, तंत्र अधिकारी कुलदीप राऊत अाणि नियंत्रण निरीक्षक मिलिंद जंजाळ यांच्या स्वाक्षरीने तयार करण्यात अाला असून, अाता अहवालानुसार शासन काेणती कारवाई करते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले अाहे. 

जादादराने धान्य म्हणून विकले : हरभराबियाणे घोटाळ्यात प्रथम जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकाऱ्यांनी प्राथमिक चाैकशी करुन एसएअाे कार्यालयात अहवाल सादर केला. एसएअाे कार्यालयाने (उच्चस्तरीय चाैकशी पथक) तयार केलेल्या अहवालातही या चाैकशीचा उल्लेख केला अाहे. अाॅक्टाेबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उगवा येथील काही शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांच्या नावे अनुदानित बियाणे खरेदी केले. नंतर गावात जावून बियाण्यांच्या बॅगा फाेडल्या. नंतर बॅगा भरुन हेच बियाणे नंतर बाजारात वाढीव दराने धान्य म्हणून विक्री केली, असे नमूद अाहे. 

हरभरा घोटाळ्याच्या चाैकशी अहवालात पुढीलप्रमाणे कार्यवाही प्रस्तावित करण्यात अाली अाहे. 
१) अनुदानाची ९९ लाख ४९ हजार १२५ रुपयांची रक्कम पुरवठा संस्थांना देण्याच्या चाैकशी पथकाच्या निर्णयास मान्यता देण्यात यावी. 
२) बियाणे पुरवठादार शासनस्तरावरून अावश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. 
३)संबंधित कृषि सेवा केंद्रांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात यावेत. 
४) गैरप्रकारांमध्ये काही शेतकऱ्यांचा सहभाग असून, त्यांच्याविरुद्ध काय कार्यवाही करावी, याबाबत मार्गदर्शन मिळावे. 

कृभकाेचाही घोळ 
एसएअाे कार्यालयाने कृभकाे (कृषक भारती काे-अाॅप.) ला ६१५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्याचा अादेश दिला. त्या अनुषंगाने कृभकाेने अनुदानासाठी यादी सादर केली. या यादीनुसार ६११.१० क्विंटल बियाण्याचा पुरवठा झाला. त्यानंतर ६१४.७० क्विंटल बियाण्यांच्या अनुदानासाठी देयके सादर करण्यात अाली. प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांना ४५८ .६० क्विंटल बियाण्यांचे वितरण झाले. त्यामुळे बियाण्यांची रक्कम देय ठरवता येणार नाही, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात अाले अाहे. आता पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. 

गंभीर नाही राबिनी 
एसएअाे कार्यालयाने राबिनी या संस्थेला ६१५ क्विंटल बियाणे पुरवठा करण्यास सांगितले. ६०७.८० क्विंटल बियाणे वितरित केल्याचे अनुदानासाठी सादर केलेल्या यादीवर नजर टाकल्यास दिसून येते. तसेच ६०५.७० क्विंटल बियाण्यांच्या अनुदानासाठी देयके सादर करण्यात अाली. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ४४३.१० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा झाल्याचे अहवालात नमूद केले अाहे. यामुळे राबिनी या संस्थेने गांभीर्याने जबाबदारी पार पाडल्याचे दिसून येत नाही, अशा शब्दात चाैकशी अहवालात ताशेरे अाेढण्यात अाले अाहेत. 

महाबीज निष्काळजी 
एसएसअाे कार्यालयाने महाबीजला १२ हजार ८७८ क्विंटल बियाणे पुरवठ्याचा अादेश दिला हाेता. मात्र वितरकांकडे १२०२८.७० बियाणे क्विंटल बियाणे आढळून अाले. महाबीजने अनुदानासाठी सादर केलेल्या यादीनुसार १२१५६.९५ क्विंटल बियाणे पुरवठा झाल्याचे दिसून अाले. तसेच १२०३६.३० क्विंटल बियाण्याचे अनुदान मिळावे, यासाठी देयके सादर करण्यात अाली. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना ८५६०.६० क्विंटल बियाणे वितरित झाले. त्यामुळे महाबीजसारख्या यंत्रणेचा निष्काळजीपणा लक्षात येताे, असा ठपका अहवालात ठेवण्यात अाला अाहे.
 
असा घातला फसवणुकीचा घाट 
चाैकशीअहवालात महाबीज, कृभकाे, राबिनी या बियाणे पुरवठादार संस्थांवर ताशेरे अाेढण्यात अाले असून, पुरवठादार संस्थेस खाेटी देयके सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे दिसून येते, असेही नमूद केले अाहे. 
बातम्या आणखी आहेत...