आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 टक्के ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया फेब्रुवारीपासून प्रारंभ, चालढकल करणाऱ्या शाळांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शिक्षणहक्क अधिनियमानुसार दुर्बल वंचित घटकातील २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांना नोंदणी करण्याचे आदेश जानेवारी महिन्यामध्ये दिले होते. फेब्रुवारीपर्यंत शाळांनी या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र ज्या शाळा २५ टक्के प्रवेशाकरीता पात्र आहेत, परंतु नोंदणी करत नाहीत किंवा प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के जागा उपलब्ध करून देणार नाहीत अशा शाळांची मान्यता काढण्याबाबत तसेच नियमाप्रमाणे कायदेशीर कारवाई करण्याबाबत शिक्षण विभाग नोटीसा देणार आहे. यंदा ही प्रवेश प्रक्रिया फेब्रुवारी रविवारपासून राबवली जाणार आहे. 

शालेय शिक्षण विभागाने २०१७-१८ची प्रवेश प्रक्रिया जानेवारीपासून राबवण्यासंबधितचा शासन निर्णय काढला आहे. निर्णयानुसार प्राथमिक शिक्षणविभागाने शाळांची नोंदणी प्रक्रिया सुरु केली. फेब्रुवारी रोजी ऑनलाइन प्रक्रियेत शाळांनी केलेल्या नोंदणीची पडताळणी शिक्षणाधिकारी करणार आहेत. ज्या शाळांनी नोंदणी केली नसेल अशा शाळांना कारणे दाखवा नोटीसाही बजावण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रियांच्या सर्व फेऱ्या एप्रिल अखेर पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्यासाठी शिक्षणविभागाने तयारी केली आहे. 

पालकांनी लाभ घ्यावा: २५टक्के प्रवेशासाठी पालकांना फेब्रुवारीपासून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येईल. त्यासाठी शाळांची नोंदणी करण्यात आली आहे. दुर्बल वंचित घटकातील पाल्यांनी लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले आहे. 

प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे 
-जन्माचे प्रमाणपत्रवास्तव्याचा पुरावा 
-सामाजिकवंचितघटकासाठी पालकांचा जातीचा दाखला अनिवार्य 
-आर्थिकदुर्बलधटकातील विद्यार्थांच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला 
-दिव्यांग विद्यार्थांसाठी ४० टक्के पेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र 
 
रविवारपासून ऑनलाइन पालकांना भरता येईल अर्ज 
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे : 5 फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी 
पहिली लॉटरी काढणे : २७ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी 
पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेणे : 1 मार्च ते 9 मार्च 
शाळांनी रिक्त पदांची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा दर्शविणे :- १० मार्च ते ११ मार्च 
दुसरी लॉटरी :- १४ मार्च ते १५ मार्च 
पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेणे :- १६ मार्च ते २१ मार्च 
शाळांनी रिक्त पदांची माहिती तपासून उर्वरित रिक्त जागा दर्शविणे :-२२ ते २३ मार्च 
तिसरी लॉटरी :- २४ ते २५ मार्च 
पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेणे :-२७ मार्च ते 1 एप्रिल 
शाळांनी रिक्त पदांची माहिती तपासून उव्ररित रिक्त जागा दर्शविणे :-३ एप्रिल ते एप्रिल 
चौथी लॉटरी :- 7 ते 8 एप्रिल 
पालकांनी शाळेत जाऊन प्रवेश घेणे :-१० एप्रिल ते १५ एप्रिल 
शाळांनी रिक्त पदांची माहिती तपासून उव्ररित रिक्त जागा दर्शविणे :१७ ते १८ एप्रिल 
पाचवी लॉटरी :१८ ते २० एप्रिल 
त्यानंतर शाळेत प्रवेश मिळेल.