आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण फिल्डवर, पुनर्वसन कागदावरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क असल्याने जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाची आकडेवारी लक्षात घेतली तर गेल्या तीन वर्षांत शाळाबाह्य मुलांची आकडेवारी कमी होण्याऐवजी दुपटीने वाढली आहे. सर्वेक्षण जरी फिल्डवर झाले असले तरी पुनर्वसन मात्र कागदावरच राहिले, असे यावरून स्पष्ट दिसून येते.
असंघटित लोकांच्या मुलांना शिक्षणाचा मूलभूत हक्क मिळावा, त्यांची मुले प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षण विभागाने जुलै रोजी सर्वच शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या नेतृत्वात ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. याशिवाय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्या मार्गदर्शनात तयार करण्यात आलेल्या पथकाने जुलै ते ३१ जानेवारीदरम्यान सर्वेक्षण केले. तालुकास्तरावर तहसीलदार हे अध्यक्ष तर सचिव गटशिक्षणाधिकारी होते. गावस्तरावर अध्यक्ष सरपंच सचिव सेवाज्येष्ठता मुख्याध्यापक यांच्यावर जबाबदारी सोपवली. मनपा, जिल्हा, तालुका, गावस्तरांवर समन्वयासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या. सुमारे १०० घरांसाठी एक सर्वेक्षण अधिकारी, २० सर्वेक्षण अधिकाऱ्यांवर झोनल, २० झोनल अधिकाऱ्यांवर एक नियंत्रक, अशी रचना करण्यात आली. सकाळी ते सायंकाळी या वेळेत हे सर्वेक्षण केले. काही एनजीआेंनी सुद्धा या मोहिमेत सहभाग घेतला. सर्वेक्षणादरम्यान गजबजलेल्या वस्त्या, झोपडपट्ट्या, बसस्थानक, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाण, बाजार, खेडेगाव, वाडी, पाडे, तांडे, शेततळे, जंगल, गावाबाहेरची पाल, वीटभट्ट्या, दगडखाणी, मोठी बांधकामे, स्थलांतरित कुटुंबे, भीक मागणारी मुले, तमाशा कलावंतांची वस्ती, अस्थायी निवारा, भटक्या जमाती अशा ठिकाणी शाळाबाह्य मुले सापडलीत. जुलै २०१५ रोजी एकाच दिवशी २१५ मुले सर्वेक्षणादरम्यान आढळून आली. जुलै महिन्यात सर्वेक्षण झाल्यानंतर सुद्धा आजही बरीच मुले प्राथमिक शिक्षणापासून वंचित असल्याचे वास्तव आहे. ३१ जानेवारी २०१५ रोजीच्या आकडेवारीवरून जिल्ह्यात महापालिका जिल्हा परिषद क्षेत्रात ६४३ मुले शाळाबाह्य आजही आहेत.

"त्या' मुलांसाठी निवासी वसतिगृह
^शाळाबाह्य ६४३ मुलांपैकी ५१८ जणांना दाखल करून घेण्यात आले होते. शिवाय चालू शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये जी मुले कधीच शाळेत गेली नाही, त्यांच्यासाठी सहा महिन्यांचे निवासी वसतिगृह वास्तव्याच्या परिसरातील केंद्र शाळांमध्ये सुरू करण्यात येणार आहे.'' सुवर्णा नाईक, संशोधनसहायक, सर्व शिक्षा अभियान, अकोला