आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Get New Look In Public Contribution In Akola

लोकवर्गणीतून शाळेची रंगरंगोटी; बोंदरखेडवासीयांनी घेतला पुढाकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बोंदरखेड येथील गावकऱ्यांनी शासनाची कुठलीही मदत घेता जिल्हा परिषद शाळेची रंगरंगोटी करण्याचा निर्णय घेऊन यासाठी गावकऱ्यांनी तब्बल २८ हजार रुपये लोकवर्गणीही गोळा केली. या लाेकवर्गणीतून शाळेची रंगरंगाेटी करण्यात अाली.

केवळ साडेचारशे लोकसंख्या असलेल्या बोंदरखेड गावातील जिल्हा परिषद शाळेची रंगरंगोटी करण्यासाठी मुख्याध्यापक संजय पाटील शिक्षक रमेश काकड यांनी ग्रामस्थांकडे मदतीची मागणी केली होती. याबाबत चर्चा झाल्यानंतर नागरिकांनी गावातच लोकवर्गणी करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकाने आपली इच्छा ऐपतीनुसार मदत करण्याची तयारी दर्शवली. शाळा दुरुस्ती रंगरंगोटीसाठी कोणी ५००, तर कोणी हजार, तर मजुरी करणाऱ्यांनी १०० ते २०० रुपये, अशी वर्गणी मुख्याध्यापकांकडे जमा केली. त्यातून शाळेची रंगरंगाेटी करण्यात अाली. शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी झाडे लावून जगवली.

यंदा पाऊस पीक चांगले झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बाजू कमकुवत असली, तरी बोंदरखेड येथील नागरिकांनी सकारात्मक भूमिका घेऊन इतरांसमोर एक आदर्श मांडला आहे. एरवी प्रत्येक गोष्टीसाठी शासनाकडे मदत मागणाऱ्या इतर नागरिकांसाठी बोंदरखेडवासीयांनी आपल्या गावातील शाळेच्या सौंदर्यीकरणासाठी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पैसे मागताच झाले जमा
"गावातीलनागरिकांच्याघरी पैसे मागण्यासाठी जावे लागले नाही. गावातील नागरिकांनी स्वेच्छेनेच निधी जमा केला आणि त्यातून शाळेला रंगरंगोटी केली.''
-रमेश काकड, शिक्षक,बोंदरखेड.

"गावातील नागरिकांनी शाळेसाठी मोठे सहकार्य केले आहे. नागरिकांनी शाळेच्या प्रत्येक उपक्रमाला सहकार्यच केले आहेे. या सहकार्याबद्दल आभारी आहे.''
-संजय पाटील, मुख्याध्यापक