आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: ट्रकच्या धडकेत 13 वर्षीय शाळकरी मुलगी जागीच ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - रिकाम्या गॅस सिलिंडर्सने भरलेल्या भरधाव ट्रकची धडक लागून झालेल्या भीषण अपघातात १३ वर्षीय शाळकरी मुलगी जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना आज, २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास ३७ किमी अंतरावरील वडगाव बस थांब्याजवळ घडली. साक्षी ज्ञानेश्वर सुलताने असे मुलीचे नाव असून, ती मूर्तिजापूर तालुक्यातील वडगावची होती. 
 
वडुरा येथील प्राथमिक शाळेत शिकणारी ही विद्यार्थिनी शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक असलेला फोटो काढून लोणी(टाकळी) येथून आपल्या मैत्रिणी समवेत गावी परत जात होती. वडगाव बस थांब्यावर रस्ता पार करत असताना अमरावतीकडून धनजच्या गॅस प्लांटकडे भरधाव जाणाऱ्या ट्रक (क्र.सीजी ०४ जेए२५०५) ने तिला जबर धडक दिली. धडक एवढी जबर होती की, तिचा मेंदू बाहेर पडून घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच हेपोकॉ सुनिल सव्वालाखे पोकॉ शिवानंद मुळे घटनास्थळी पोचले. नागपूरचा रहिवासी असणारा ट्रक चालक राजू हारगुडे याने अपघातानंतर धनज पोलिस स्टेशन गाठले. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला असून, ठाणेदार एपीआय नितिन पाटील यांच्या मार्गदर्शनात हेपोकॉ सुनिल नवलाखे पुढील तपास करत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...