आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

700 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांची भेट, ‘रोटरी अॅग्रोसिटी’चे स्कूल जोडो अभियान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गरजू व्यक्तींना सहकार्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, त्यांना देण्यातील आनंद लुटता यावा या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ अकोला अॅग्रोसिटीने ‘स्कूल जोडो’ अभियान राबवले. या अभियान अंतर्गत शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कडील सुस्थितीतील शालेय साहित्य जमा करुन हे सर्व साहित्य ग्रामीण भागातील जवळपास ७०० गरजू विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आले. 

रोटरी क्लब ऑफ अकोला अॅग्रोसिटी या अभियानासाठी कार्य करत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘देण्याचा आनंद घ्या’ या प्रकल्पाद्वारे त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शहरी भागातील अनेक विद्यार्थी दरवर्षी शाळेसाठी नवे दप्तर, टिफीन, बॉटल, इतर शालेय साहित्य विकत घेतात. त्यांच्या कडील जुने साहित्य पडून राहतात. हेच चांगले साहित्य गरजू विद्यार्थ्याला देऊन त्याच्या चेहऱ्यावर देखील हास्य फुलवता येते, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी, त्यांना देखील देण्यातील आनंद लुटता यावा, बालवयातच सामाजिक जाणीव निर्माण व्हावी गरजू विद्यार्थ्यांना देखील मदत व्हावी या उद्देशाने ‘स्कूल जोडो’ हे अभियान राबवण्यात आले. 

या अभियान अंतर्गत शहरातील कोठारी कॉन्व्हेंट, पोदार इंटरनॅशनल स्कूल, सेंट अॅन्स स्कूल, खंडेलवाल ज्ञानमंदिर शाळा, प्रभात किड्स स्कूल, विवेकानंद कॉन्व्हेंट, स्कूल ऑफ स्कॉलर्स या शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या जवळील चांगल्या स्थितीतील स्कूल बॅग, स्कूल शुज, टिफीन, बॉटल, कंपास, नोटबुक जमा केले. जमा साहित्याची विभागणी करून जिल्हा परिषद घुसर केंद्र, दहिगाव गावंडे केंद्र, बोरगाव मंजू केंद्र अंतर्गत येणाऱ्या १६ शाळेतील जवळपास ६०० ते ७०० गरजू विद्यार्थ्यांना हे साहित्य भेट दिले. या अभियानात सहभागी शहरातील सातही शाळेच्या मुख्याध्यापकांचा रोटरीचे प्रांतपाल डॉ. राजन यांनी सन्मान केला. या प्रकल्पासाठी रोटरी क्लब ऑफ अकोला अॅग्रोसिटीचे अध्यक्ष अतुल चौधरी, सचिव शशांक जोशी, प्रकल्प प्रमुख डॉ. ज्ञानसागर भोकरे, कोषाध्यक्ष सुनील घोडके, रवी कुलट, संगीता चौधरी, प्रेरणा घोडके, संपदा जोशी, कळमकर, अर्चना पाटील, अश्विनी भोकरे, प्रफुल महलनकर, अंजली धोतकर, दीपाली रत्नपारखी, हर्षा गोदे, संध्या अकोटकर यांनी प्रयत्न केले. या अभियानात शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. 
बातम्या आणखी आहेत...