आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळांमधील किलबिल आजपासून, जिल्ह्यात ४३४ शाळांमध्ये तयारी पूर्ण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - राज्यातील जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळांमधील विद्यार्थी, पालक शिक्षकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: २७ जून रोजी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. त्यात जिल्ह्यातील ब्रम्ही जळगाव नहाटे येथील शाळांचा समावेश आहे.
राज्यातील शाळा १५ जून २७ जून अशा दोन टप्प्यांत सुरू होतात. त्यापैकी दुसऱ्या टप्प्यात शाळा सुरू होण्याच्या निमित्ताने या उपक्रमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील एका शाळेची निवड झाली आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील दोन शाळा निवडल्या गेल्या आहेत. शाळा सिद्धी या राष्ट्रीय राज्यस्तरीय संयुक्त उपक्रमास पात्र झालेली या तालुक्यातील ब्रम्ही खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तंत्रस्नेही शिक्षक कार्यरत असलेली अकोट तालुक्यातील जळगाव नहाटे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या दोन शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक पालक संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होईल. दोन्ही शाळांमधील पाच विद्यार्थी, पाच पालक संबंधित शिक्षकांशी व्हीसीद्वारे मुख्यमंत्री स्वत: २७ जूनला सकाळी ११ वाजता संवाद साधणार आहेत.
अकोला | दोनमहिण्यांच्या अवकाशानंतर उद्या, सोमवार २७ जूनपासून शाळांमधील किलबील पुन्हा एेकायला मिळणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी िशक्षण िवभागाने केली असून तेल्हारा तालुक्यातील दहेगाव (अवताडे) येथे मुख्य प्रशासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सन २०१६-१७ चे शैक्षणिक वर्ष या महिण्याच्या १७ तारखेपासून सुरु झाले. विदर्भात मात्र ते दहा दिवस उशीरा २७ जूनपासून सुरु होत आहे. जिल्हा परिषद खासगी संस्था मिळून जिल्ह्यात एकूण ४३४ प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत. या शैक्षणिक दालनातून हजारो विद्यार्थी ज्ञानार्जन करीत असतात. त्या सर्वांचे उद्याच्या पहिल्या दिवशी शिक्षकांतर्फे स्वागत केले जाणार आहे.

शाळेचा पहिला दिवस असल्याने बहुतेक शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उद्याच पुस्तकेही वितरित केली जातील. यािशवाय बहुतेक गावांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून सत्रारंभ करण्याचा कार्यक्रम आखला आहे. शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी अशा विविध घटकांसह गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींनाही प्रभातफेरीत सामावून घेतले जाणार आहे. याशिवाय काही शाळांमध्ये पुष्पगुच्छ देऊन नवागतांचे (नव्याने प्रवेश घेतलेले विद्यार्थी) स्वागतही केले जाईल. मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी लोकप्रतिनिधींच्या हस्ते हे स्वागत केले जाणार आहे.

चौकट---
दहेगावात मुख्य कार्यक्रम

शैक्षणिक सत्र आरंभ करण्याचा मुख्य कार्यक्रम तेल्हारा तालुक्यातील दहेगाव (अवताडे) येथे आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळी वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. तत्पूर्वी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढली जाणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, तालुका पातळीवरील इतर अधिकारी गावपातळीवरील पदािधकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

चौकट---
असा असेल सत्रारंभ
- बहुतेक गावांमध्ये प्रभातफेरींचे आयोजन
- विद्यार्थी वाजत-गाजत पोहचतील शाळांमध्ये
- विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके शालेय सािहत्य
- नवागतांचे केले जाणार मुख्याध्यापक-िशक्षकांतर्फे स्वागत
- प्रत्येक शाळेत लोकप्रतिनिधींची उपस्थिती, छोटेखानी कार्यक्रमही
बातम्या आणखी आहेत...