आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सचिवाच्या दबावानेच पतीची आत्महत्या, महाबीज' कर्मचारी आत्महत्या प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला; महाबीज कर्मचारी पतसंस्थेचे सचिव डी. एन. देशमुख यांच्या दबावामुळेच पती किसनराव सदाशिव भांबेरे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पत्नी नंदा भांबेरे यांनी केला. याबाबत २२ सप्टेंबरला डाबकी रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी प्रकरण चौकशीत ठेवले आहे.
किसनराव भांबेरे हे महाबीज कर्मचारी पतसंस्थेत व्यवस्थापकपदी कार्यरत होते. सचिव असलेले डी. देशमुख हे महाबीजमध्ये सहायक क्षेत्रीय अधिकारी म्हणून नोकरीवर आहेत. महाबीजमार्फत शेतकऱ्यांना मिळणारे अनुदानाचे चेक देशमुख हे महाबीज कार्यालयातून घेऊन येत असत.
पतसंस्थेच्या खात्यात जमा करण्यासाठी दबाव टाकत केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याच्या धमक्या देत, असे पतीने बरेचदा सांगितले होते. मागील खरीप हंगामात बियाणे कमी उगवल्यामुळे महाबीजने शेतकऱ्यांना अनुदान दिले ते चेक सहायक क्षेत्रीय अधिकारी या नात्याने शेतकऱ्यांना देऊन शेतकऱ्यांकडून बियाण्याची पावती, टॅग, रिकामी पिशवी कार्यालयात जमा करावी, असे देशमुख यांना सांगितले होते. परंतु, त्यातील काही चेक देशमुख यांनी महाबीज कार्यालयातून आणून शेतकऱ्यांच्या नावावर अकाउंट ऑफ महाबीज क्रेडिट सोसायटी असा स्टॅम्प मारून ते पतसंस्थेच्या खात्यात जमा करण्यासाठी किसनराव भांबेरे यांच्यावर दबाव आणला.

प्रकरण उघडकीस आल्यावर महाबीजने डी. एन. देशमुख यांचे निलंबन केले. देशमुख यांच्या दबावामुळेच पतीने आत्महत्या केली असून, याप्रकरणी गुन्हा दाखल करून न्याय मिळावा, अशी िवनंती नंदा भांबेरे यांनी केली आहे.