आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनासह ३० हजार रुपयांचा गुटखा जप्त; निंबा फाट्यावरील घटना, उरळ पोलिसांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उरळ - अवैध विमल गुटखा काळ्या बाजारात विक्रीकरिता एका मोटार सायकलसह घेऊन जाणाऱ्या एकाला उरळ ठाणेदार सोमनाथ पवार यांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून विमल गुटखा, एमएच ३०, एएच ७०२० क्रमांकाच्या मोटार सायकलसह ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अन्न औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. ही घटना निंबा फाटा येथे शुक्रवारी सकाळी १० वाजता घडली. गजानन समाधान दोमोदर रा. नया अंदुरा असे आरोपीचे नाव आहे. गजानन दाेमोदर हा गेल्या अनेक दिवसांपासून अवैध विमल गुटखा काळ्या बाजारात विक्री करत होता. याबाबतची माहिती उरळचे ठाणेदार सोमनाथ पवार यांना मिळाली. त्यांनी माहितीच्या आधारे निंबा फाटा येथे सापळा रचून ही कारवाई केली. कारवाई ठाणेदार सोमनाथ पवार यांच्यासह हेड कॉन्स्टेबल जयेश शिंगाारे, नईम मेजर यांनी केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...