आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एमआयडीसी’तून 20 लाखांचा गुटखा जप्त, पोलिस अधिक्षकांचा सोमवारी पहाटे छापा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गेल्या सहा महिन्यांच्या काळात पोलिसांनी छापे टाकून आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केला तरी गुटख्याची तस्करी बंद होण्याचे नाव घेत नाही. सोमवारी पुन्हा एकदा एमआयडीसीमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाड टाकून नरेश पलंग याच्या गोडावूनमधील २० लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. 

अकोला - गोदामात ठेवण्यात आलेला २० लाख रुपयांचा प्रतिबंधीत गुटख्याचा साठा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी पहाटे छापा टाकून जप्त केला. 
 
राज्यात गुटखा बंदी झाल्यानंतरही मोठया प्रमाणात गुटखा साठयाची छुप्या मार्गाने वाहतूक करण्यात येत असल्याचे या कारवाईतून पुढे आले आहे. एमआयडीसीतील गोदामात गुटख्याचा साठा असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमूख हर्षराज अळसपुरे यांना रविवारी रात्री मिळाली, त्यांनी या परिसरात पाळत ठेवली. ठिकाणाची निश्चित माहिती होताच छापा टाकला, या गोदामातून २० लाख रुपयांचा प्रतिबंधीत असलेला गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. नरेश पलंग याचा हा गुटखा असून यापूर्वीही मार्च रोजी नरेश पलंग हा गुटख्याची वाहतूक करताना पोलिसांच्या हाती लागला होता. तेव्हा पोलिसांनी त्याच्याकडून १५ लाख ५० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला होता. एका महिन्यात तब्बल एक कोटी रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्यासह पथकाने केली. अमरावती मार्गे मध्यप्रदेशातील गुटखा अकोल्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...