आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कापशी’चा प्रस्ताव शासनाकडे पाठवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-होणारीहद्दवाढ वाढणारी लोकसंख्या या बाबी लक्षात घेऊन भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कापशी तलाव मदतीस येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन कापशी तलाव पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, अशी मागणी भारिप-बमसंचे गटनेते गजानन गवई यांनी एका पत्रातून आयुक्त सोमनाथ शेटे यांना केली आहे. विशेष म्हणजे याअनुषंगाने दिव्य मराठीने २२ जुलैला वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे कापशी तलावाकडे लक्ष वेधले होते.
एकेकाळी संपूर्ण शहराची तहान कापशी तलाव भागवत होता. पुढे वेगवेगळ्या योजना कार्यान्वित झाल्याने या कापशी तलावाकडे दुर्लक्ष झाले. परंतु, गेल्या काही वर्षांपासून शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याअनुषंगानेच मोर्णा प्रकल्पातील पाण्याची उचल करता यावी, यासाठी २८ कोटी रुपयांचा मोर्णा प्रकल्प ते महान जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. एवढे कोट्यवधी रुपये खर्च करूनही केवळ पाच दशलक्षघनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे.या पाण्याच्या आरक्षणासाठीही लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. एवढे करूनही समस्या सुटणार नाही. त्यामुळेच भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी कापशी तलाव महत्त्वाचा आहे.
शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या कापशी तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. यामुळे साठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. गाळ काढल्यास या तलावात मुबलक पाणी साठवणे शक्य आहे. यापूर्वी तलावातील पाणी नेहरू पार्क चौकातील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जात असे. परंतु, तसे करता कापशी तलाव परिसरातच छोटेखानी जलशुद्धीकरण केंद्र उभारल्यास या तलावातून थेट जुन्या शहराला पाणीपुरवठा होऊ शकतो. विशेष म्हणजे पाणीपुरवठा ग्रॅव्हिटीने होत असल्याने विद्युत खर्चही वाचणार आहे.
या सर्व बाबी लक्षात घेऊन गाळ काढणे, जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठवावा. लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्र्यांनी लक्ष घातल्यास निधी मिळण्यास अडचणी जाणार नाहीत. त्यामुळे या मागणीची गंभीरतेने दखल घ्यावी, अशी मागणी गजानन गवई यांनी आयुक्तांना केली आहे. २८ कोटी रुपयांचा मोर्णा प्रकल्प ते महान जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. महापालिका