आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत सिदाजी महाराजांच्या यात्रा महोत्सवास प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पातूर - श्रीसंत सिदाजी महाराजांच्या यात्रा महोत्सवास गुढीपाडव्याच्या दिवशी एप्रिल रोजी प्रारंभ झाला. १७ एप्रिलपर्यंत आयोजित या सोहळ्यात अखंड हरिनाम, श्रीमद‌् भागवत सप्ताहास सुरुवात झाली आहे. यामध्ये भागवताचार्य गजानन गिऱ्हे महाराज कथावाचन करत आहेत.
एप्रिल रोजी दुपारी १२ वाजतादरम्यान मंदिर परिसरात संतोष माहोकार यांच्या हस्ते पूजन करून १०५ फूट उंचीची गुढी उभारण्यात आली. या वेळी रामराव माहोकार, रामदास ठाकरे, प्रकाश काळे, नारायण भाकरे, गजानन काळे, वसंत ठाकरे, संजय काळे, प्रशांत टापरे, भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक राजू उगले, अजय ढोणे, संतोष राऊत, रामपाल इंगळे, राजेश निमकंडे, राजू भवाने, रवी फलके, स्वप्निल गणेशे, बाळू वडतकार, रामराव माहुलीकर, दामोदर राऊत, गजानन उगले, वसंता गाडगे, बाळू निमकंडे, महादेव निमकंडे, प्रमोद कदम, गणेश वडतकार, महादेव उगले, सुरेश माहुलीकर, गोलू बायस, महेश बंड, गणेश सावकार, शंकर बोचरे, कैलास बगाडे, सुरेश श्रीनाथ, वसंता वडतकार, संजय पाटील, दीपक शिंदे, दीपक सदर, बाळू उगले, गोविंदा उगले, सदानंद राखोंडे आदी उपस्थित होते. या सोहळ्यात दररोज सकाळी ते दुपारी १२ दुपारी ते सायंकाळी या वेळेत श्रीमद‌् भागवत कथा, सायंकाळी ते रात्री हरिपाठ ते १० हरिकीर्तन होत आहे. सोहळ्यात गजानन महाराज, माधव महाराज, जगन्नाथ महाराज, रामेश्वर महाराज, विठ्ठल महाराज, सुरेश महाराजांचे हरिकीर्तन होणार आहे. १६ एप्रिलला रात्री विलास राऊत, उगले देवीदास निलखन यांचा आदर्श गावावर आधारित गीतांचा तसेच भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे. १७ एप्रिलला गजानन महाराज गिऱ्हे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, दुपारी १२ वाजता गोपालकाला होणार आहे. सोहळ्यासाठी सिदाजी महाराज भजन मंडळ, खडकेश्वर भजन मंडळ, पाटील भजन मंडळ, सिदाजी महाराज महिला भजन मंडळाची साथसंगत राहणार आहे.

भक्ति सोहळा
शके १८१० पासून दरवर्षी सोहळा
संत सिदाजी महाराजांचा जन्म माहोकार कुळात झाला होता. त्यांचे वडील हरिभक्त राघोजी पाटील आई अलोका या होत्या. "हर हर महादेव संभा, काशी विश्वनाथ शिव लिंगा' असा जप महाराज करत असत. शके १८१० पासून सिदाजी महाराजांचा महोत्सव त्यांच्या जिवंतपणी दोन वर्षांपासून सुरू झाला. १८१२ मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी त्यांनी समाधी घेतली. तेव्हापासून दरवर्षी महोत्सव होतो.